🕒 1 min read
मुंबई: वेस्ट इंडिज विरुद्ध विराट कोहलीला केवळ १८ धावा करता आल्या होत्या. मात्र त्याने एक नवीन रेकॉर्ड बनवला आहे. ज्यात त्याने सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंह धोनी या दोघांना मागे टाकले आहे.
भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचा स्टार फलंदाज विराट कोहली घरच्या मैदानावर १०० एकदिवसीय सामने खेळणारा पाचवा भारतीय क्रिकेटपटू ठरला. भारतीय भूमीवर १६४ एकदिवसीय सामने खेळणारा महान तेंडुलकर या यादीत आघाडीवर आहे. तर या यादीत महेंद्रसिंह धोनी दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने भारतात १२७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याच्यापाठोपाठ भारतात ११३ वनडे खेळणारा मोहम्मद अझरुद्दीन आणि १०८ खेळलेला युवराज सिंग यांचे नाव आहे.
विराट कोहलीने २०१० मध्ये भारतीय संघात पर्दापण केले होते. त्यानंतर त्याने अनेक विक्रम रचले आणि तोडले सुद्धा आहेत. धावांच्या बाबतीत सचिन तेंडुलकर नंतर त्याचेच नाव घेतले जाते. वेस्ट विरुद्धच्या मालिकेत विराटला दोन्ही सामन्यात चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याचे चाहते विराटचं कामगिरी बाबत चिंता व्यक्त करत आहे. विराट कोहली अनेक दिवसांपासून खराब कामगिरीचा सामना करत आहे. त्याचे शेवटचे शतक दोन वर्षांआधी आले होते. तेव्हा पासून प्रत्येक सामन्यात चाहते त्याच्या ७१व्या शतकाची वाट बघत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- हिजाब प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयातून दुसऱ्या न्यायालयात वर्ग करण्यास सर्वोच्च न्यायलायचा नकार
- ‘किंग’ बनायचयं, ‘किंग मेकर’ नाही; शिवतीर्थ’वरील बैठकीनंतर मनसेची भूमिका
- टांझानियातील किली आणि नीमा पॉल यांची लता दीदींना आदरांजली
- VIDEO : कॅच घेताच विराटच्या अंगात अवतरला अल्लू अर्जून, मैदानात श्रीवल्लीवर थिरकला!
- शिवसेनेचे शंभर गुंड माझ्याकडे दगड भिरकावत होते, हे पाहूनही पोलिसांनी काहीच केलं नाही- किरीट सोमय्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
