बंगळुरू: हिजाब बंदी वरून कर्नाटकात सुरू असलेला वाद सध्या चिघळला असून प्रकरण उच्च न्यायालयात गेले आहे. याच पार्श्वभूमिवर कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालये एक आठवडा बंद ठेवली गेली आहेत. कर्नाटक उच्च न्यायालयात उडीपि येथे काही विद्यार्थिनींना हिजाब घालून प्रवेश नाकारला, तसेच अनेक शाळा आणि महाविद्यालयात बंदी घालण्यात आली यावर खटला सुरू आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रितू राज अवस्थि यांनी याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका खंडापीठाची नियुक्ती केली आहे. हे प्रकरण कर्नाटक न्यायालयातून दुसऱ्या न्यायालयात नेण्यास किंवा वर्ग करण्याच्या मागणीला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. दरम्यान बेगळुरूचे पोलीस आयुक्त कमल पंत यांनी १४४ कलामंतर्गत शाळा आणि महाविद्यालयाच्या आवारापासून २०० मिटरच्या क्षेत्रात एकत्र येणे, आंदोलन, निषेध करणे इत्यादी गोष्टींवर बंदी घातली आहे. फेब्रुवारी २२ पर्यंत कोणत्याही प्रकारच्या आंदोलनास बंदी घातली गेली आहे.याप्रकरणी कर्नाटक आणि इतर राज्यात वाद निर्माण झाला असून सर्वच स्तरतून नेते आणि जनता याविषयी प्रतिक्रिया देत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- VIDEO : कॅच घेताच विराटच्या अंगात अवतरला अल्लू अर्जून, मैदानात श्रीवल्लीवर थिरकला!
- शिवसेनेचे शंभर गुंड माझ्याकडे दगड भिरकावत होते, हे पाहूनही पोलिसांनी काहीच केलं नाही- किरीट सोमय्या
- “कॉंग्रेस मुक्त भारत सोडा, अगोदर कॉंग्रेस मुक्त भाषण करून दाखवा”, यशोमती ठाकूर यांचे मोदींना आव्हान
- ‘पाचही राज्यात भाजपची नव्हे, असंतोषाची लाट’; विजय वडेट्टीवार यांची टीका
- हॉकी प्रो लीग: भारतीय संघाने उडवला १०-२ ने आफ्रिकेचा धुव्वा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

