मुंबई : भारतने वेस्ट इंडीजला ४४ धावांनी पराभूत केले आहे.तसेच तीन सामन्याच्या मालिकेतील दोन सामने जिंकत मालिकाही आपल्या नावावर केली आहे. विंडीजवर विजय मिळताच भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली मैदानावर व्हायरल झालेला श्रीवल्ली डान्स करताना दिसला आहे.
विराट कोहली मैदानवर नेहमी चाहत्यांचे फलंदाजीद्वारे मनोरंजन करत असतो. तर क्षेत्ररक्षण करताना तो अनेकदा मैदानावर वाजणाऱ्या गाण्यावर थिरकत असतो. यंदाही त्याने पुष्पा ट्रेंड बघता अल्लू अर्जुनच्या स्टाईलने “श्रीवल्ली” गाण्याची फेमस स्टेप केली आहे. विराटचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या संख्येयने व्हायरल होत आहे.
https://twitter.com/Naveen48336812/status/1491635953030471683?s=20&t=V7bgYtVXqeQp0JF65O7yNQ
वेस्ट विरुद्धच्या मालिकेत विराटला दोन्ही सामन्यात चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याचे चाहते विराटचं कामगिरी बाबत चिंता व्यक्त करत आहे. विराट कोहली अनेक दिवसांपासून खराब कामगिरीचा सामना करत आहे. त्याचे शेवटचे शतक दोन वर्षांआधी आले होते. तेव्हा पासून प्रत्येक सामन्यात चाहते त्याच्या ७१व्या शतकाची वाट बघत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- “कॉंग्रेस मुक्त भारत सोडा, अगोदर कॉंग्रेस मुक्त भाषण करून दाखवा”, यशोमती ठाकूर यांचे मोदींना आव्हान
- ‘पाचही राज्यात भाजपची नव्हे, असंतोषाची लाट’; विजय वडेट्टीवार यांची टीका
- हॉकी प्रो लीग: भारतीय संघाने उडवला १०-२ ने आफ्रिकेचा धुव्वा
- गडकरींच्या घराबाहेर काँग्रेस भाजप आमने-सामने; पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
- “राऊत साहेब महाराष्ट्राची मान तेव्हाच खाली गेली जेव्हा..”, केशव उपाध्येंचा टोला


