नवी-दिल्ली : पुणे महापालिकेमध्ये (PMC) जात असताना भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर शिवसैनिकांनी (Shivsainik) धक्काबुक्की केली. किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की होत असताना ते पायऱ्यांवरून घसरून पडले. या प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या सांगण्यावरून ही धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप पुणे भाजप शहराध्यक्षांनी केला होता. याच पार्श्वभूमीवर आज(१० फेब्रु.)किरीट सोमय्या यांनी हल्ल्याची चौकशी व्हावी या मागणीसह केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली.
गृह सचिवांची भेट घेतल्यानंतर किरीट सोमय्या आणि खासदार मनोज कोटक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलत असतांना सोमय्या म्हणाले की,‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने संजय राऊतांच्या कंपनीला बेनामी कंत्राटं दिले. तसेच त्यांचे १०० कोटी रुपयांचे घोटाळे मी उघड केले. त्यामुळे शिवसेनेच्या शंभर गुंडांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला’, असे सोमय्या म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘शिवसेनेचे शंभर गुंड माझ्याकडे दगड भिरकावत होते, हे पाहूनही [पुणे पोलिसांनी काहीच केलं नाही. यासंदर्भात व्हिडिओ क्लीप आम्ही गृहसचिवांकडे सादर केली आहे. पुणे पोलिस कमिशनर अमिताभ गुप्ता यांच्यामुळे हे सर्व झाले. एक हवालदार माझ्यावर एवढा मोठा दगड मारतोय, पण त्याला कोणीच अडवलं नाही, पोलिसांनी गप्प राहण्याची भूमिका घेतली.’
महत्वाच्या बातम्या:
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र लिहीत मंगेशकर कुटुंबियांनी व्यक्त केली नाराजी
गडकरींच्या घराबाहेर काँग्रेस भाजप आमने-सामने; पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
‘पाचही राज्यात भाजपची नव्हे, असंतोषाची लाट’; विजय वडेट्टीवार यांची टीका
“कॉंग्रेस मुक्त भारत सोडा, अगोदर कॉंग्रेस मुक्त भाषण करून दाखवा”, यशोमती ठाकूर यांचे मोदींना आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

