Share

“काँग्रेसने तिकिटं काढून कामगारांना रेल्वेतून पाठवलं…”, पंतप्रधान मोदींचे टीकास्त्र

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : ७ फेब्रुवारी रोजी लोकसभेत बोलत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी काँग्रेसवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच काँग्रेस नेत्यांनी देशभर कोरोना पसरवला असल्याचेही मोदी यावेळी म्हणाले. मोदींच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, आजपासून(१० फेब्रु.)पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांना सुरुवात होत असून याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे.

लोकसभेत केलेल्या वक्तव्यासंदर्भात विचारण्यात आले असता मोदी म्हणाले की,‘लॉकडाऊन लागल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने देखील स्पष्ट केले होते की जो जिथे आहे, त्याने तिथेच थांबायला हवे. काही राज्यांनी त्यापूर्वीच लॉकडाऊन सुरू केले होते. परंतु काँग्रेसने मोफत तिकीट देऊन लोकांना जाण्यासाठी प्रोत्साहित केले. जर त्यावेळी काँग्रेसने असे केले नसते, तर श्रमिकांना काय घडतंय याचा अंदाज काही दिवसांत आला असता’, असे मोदी म्हणाले.

दरम्यान, लॉकडाऊनमध्ये जेव्हा संपूर्ण देश टाळेबंदीचे पालन करत होता. त्यावेळी महाराष्ट्रातील काँग्रेस नेते मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर उभे राहून नागरिकांना स्थलांतरित होण्यासाठी प्रवृत्त करत होते. तसेच काँग्रेस नेत्यांनी देशभर कोरोना पसरवला, असे मोदी लोकसभेच्या भाषणावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!