🕒 1 min read
मुंबई: भारतीय क्रिकेट जागा बनवणे खूप कठीण असते हा वर्षानुवर्ष होत आले आहे. युवा खेळाडूंनाही बरयाचदा भारतीय संघात खेळायची संधी मिळत नाही. असे मत केवळ क्रिकेटरसिकांचे नव्हे तर दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज एबी डिव्हिलयर्सचे (AB De Villiers) सुद्धा आहे. त्याने नुकत्याच एका मुलाखतीत याबाबत वक्तव्य केले आहे.
एबी डिव्हिलियर्सने आरसीबीसोबत केलेल्या पॉडकास्टमध्ये याबद्दल सांगितले आहे. तो म्हणाला ” गेल्या १५ वर्षांपासून मला आयपीएल क्रिकेट, भारतीय गर्दी आणि भारतीय पद्धतीने गोष्टी करण्याचा बहुमान मिळाला आहे. साहजिकच जर मी भारतात वाढलो असतो तर ते मनोरंजक ठरले असते. कदाचित मी भारतासाठी कधीच खेळलो नसतो. भारतीय संघात स्थान मिळवणे कठीण आहे. तिथे खेळायला तुमच्यात काहीतरी खास लागते.”
एबी डिव्हिलयर्स २००८ पासून आयपीएलचा भाग आहे. मात्र आरसीबीसोबत जोड्ल्या गेल्यानंतर त्याचे भारतीय क्रिकेट सोबत चांगले संबंध झाले आहे. भारतीय क्रिकेट रसिकांसाठीही एबी डिव्हिलयर्स स्टार खेळाडूंपैकी एक आहे. त्याचे भारतात अनेक चाहते आहेत. तसेच एबी डिव्हिलयर्स विराट कोहलीचा चांगला मित्र आहे. ज्यामुळे एबीसाठी भारत दुसऱ्या घरासारखे असल्याचे त्यांने यापूर्वी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींच्या टीकेवर पंतप्रधान मोदींचे प्रत्युत्तर; म्हणाले,‘जे सभागृहात बसतच…’
- UP Assembly Election 2022 : पहिल्या टप्प्यातील मतदानास सुरुवात
- IND vs WI: सलग १५ व्या वर्षी भारताचे विंडीजवर वर्चस्व कायम
- “सध्याच्या महागाईसाठीही मोदी सरकार नेहरू-गांधी आणि काँग्रेसकडे बोट दाखविणार का?”
- मनपा आयुक्तांवर शाई फेकल्याप्रकरणी आमदार रवी राणांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
