Share

‘मोदीजी ‘पीएम केअर फंड’ गेला कुठे?’ राष्ट्रवादीचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लोकसभेत भाषण करताना विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला होता. तसेच कॉंग्रेसवर देखील अनेक आरोप लावले होते. या पार्श्वभूमीवर आता विरोधक आक्रमक झाले असल्याचे बघायला मिळत आहे. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने पीएम केअर फंडवरुन केंद्र सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

कोरोनाचा उद्रेक सुरु झाल्यानंतर मोठा गाजावाजा करत पंतप्रधानांनी ‘पीएम केअर फंड’ (PM Care Fund) सुरु केला. कोविडसारखे आकस्मिक संकट कोसळल्यानंतर त्यातून बाहेर पडण्यासाठी हा फंड खर्च करण्यात येईल, असे हा फंड सुरु करताना सांगण्यात आले. पीएम इंडिया या वेबसाईटवर देखील हाच उद्देश अजूनही लिहिलेला आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही गंभीर प्रश्न विचारण्याची गरज आहे, असं राष्ट्रवादी कॉंग्रेसने ट्विट केले आहे.

पीएम केअर फंडमध्ये २०२०-२१ या वर्षात १०,९९० कोटी इतकी रक्कम जमा झालेली आहे. त्यापैकी केवळ ३ हजार ९७६ कोटी इतकीच रक्कम वितरीत झाल्याचे ऑडिट रिपोर्टमधून समोर आले आहे. १,३११ कोटी हे व्हेंटिलेटर्स बनविण्यासाठी खर्च करण्यात आले. मात्र हे व्हेंटिलेटर्स निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सतीश चव्हाण यांनी स्वतः औरंगाबाद येथील रुग्णालयात या निकृष्ट व्हेंटिलेटरचा पर्दाफाश केला होता.

तसेच एक हजार कोटी हे स्थलांतरीत मजुरांच्या सोयी सुविधांसाठी खर्च करण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच लोकसभेत बोलत असताना कोरोना पसरण्यासाठी महाराष्ट्र राज्य आणि स्थलांतरीत कामगारांना दोषी ठरवले होते. मात्र याच मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी केंद्र सरकारने श्रमिक ट्रेनची सुविधा दिली होती. त्यासाठी एक हजार कोटी खर्च करण्यात आले होते. मग मोदी महाराष्ट्राला कसे जबाबदार धरू शकतात?, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

तसेच पुढे ट्विट करत, ही दुटप्पी भूमिका कशासाठी याचे उत्तर मोदींनी देणे गरजेचे आहे, तसेच पीएम केअर फंडमधील बाकी रकमेचे काय झाले याचे उत्तरही त्यांच्याकडून अपेक्षित आहे. असं राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन प्रश्न विचारण्यात आले आहेत. याच सोबत पीएम केअर फंड का हीसाब दो, असा हॅश टॅग देखील वापरण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!