Share

हिंगणघाट जाळीत कांड: आज गुन्हा सिद्ध, उद्या होणार शिक्षा

Published On: 

🕒 1 min read

वर्धा: हिंगणघाट येथील जळीत कांड प्रकरणात दोन्ही बाजूने होणारा युक्तिवाद २१ जानेवारीला संपला होता. कोरोनामुळे या प्रकरणाची सुनावणी लांबली होती. मात्र आज ९ फेब्रुवारीला या प्रकरणाचा निकाल न्यायालय सुनावला आहे. 3 फेब्रुवारी 2020 रोजी आरोपी विकेश नगराळे शिक्षिकेला याने पेटविले होते. त्यानंतर 10 फेब्रुवारीला उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. या प्रकरणात शासनाने उज्वल निकम यांची फिर्यादी पक्षाचा वकील म्हणून नियुक्ती केली होती. घटनेपासून आरोपी विकेश नगराळे कारागृहात आहे.

मृतक अंकिता ही हिंगणघाटच्या स्व.आशा कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक म्हणून काम करत होती. पीडिता 3 फेब्रुवारीला 2020 ला सकाळी आपल्या घरातून बसने हिंगणघाटला पोहचली. कॉलेजच्या जाण्याच्या रस्त्यावर आरोपी विकेश नगराळे दबा धरून बसला होता. अंकिता दिसताच विकेशने आधीच काढून ठेवलेले दुचाकीतील पेट्रोल तिच्यावर ओतले आणि तिला पेटवून टाकले. यात गंभीररीत्या जळालेल्या अंकितावर नागपूरातील ऑरेंजसिटी रुग्णालयात उपचार सुरू होते. अंकिताने आठवडाभर मृत्यूशी झुंज दिली. 10 फेब्रुवारीला २०२० ला अंकिताने अखेरचा श्वास घेतला.

आता हिंगणघाट न्यायालयात आरोपीवरील सर्व आरोप सिद्ध झाले आहेत. त्याला या प्रकरणात दोषी ठरवले आहे. तर गुन्हेगाराला शिक्षा उद्या सुनावली जाणारा आहे. अशी माहिती सरकारी पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. ते आज पत्रकारांशी बोलत होते. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रभर निषेधाचे तीव्र स्वर उमटले होते. आणि आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी इच्छा सर्वत्र व्यक्त केली जात होती. त्यामुळे आता न्यायलय दोषीला काय शिक्षा देते, यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या:

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!