🕒 1 min read
नवी दिल्ली: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंना पत्र लिहून मोठी खळबळ माजवली आहे. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत ही मुंबई आहे आणि मुंबईचा दादा शिवसेना असल्याचे म्हणत भाजपवर निशाणा साधला आहे.
तसेच माझ्या मुलीच्या लग्नातील डेकोरेशनवाल्याला ईडीने उचलून आणले. त्याला किती पैसे मिळाले विचारलं असता डेकोरेशनवाल्याने आपले कुटुंबाशी चांगले संबंध असल्याचे म्हणत पैसे नाकारल्याचे सांगितले. पण त्याला बंदुकीचा धाक दाखवत धमकावण्यात आले. हि कसली दादागिरी आहे? असा सवाल करत ही मुंबई आहे आणि मुंबईचा दादा शिवसेना आहे, असा दम संजय राऊतांनी भाजपला दिला आहे.
तसेच उपराष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारी यंत्रणांचा वापर करत विरोधकांचा आवाज दाबवण्यात आल्याचे मोदींनीच राज्यसभेत सांगितले. मात्र त्यांचेच सरकार आणीबाणीपेक्षाही वाईट पद्धतीने राजकीय विरोधकांचा आवाज दाबत आहे. त्यामुळे राज्यसभेच्या सभापतींना याची माहिती देत पुढील लढाईसाठी पत्र लिहिले असल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान मुख्यमंत्री ठाकरेंच्या कुटुंबीयांनाही प्रचंड त्रास दिला जात आहे. रोज कोणीतरी उठतं आणि बेवड्यासारखा बडबडतो नंतर ईडी त्याच्यावर कारवाई करते. मी मागेही म्हटलो आहे की, आम्ही तुमच्या घरात घुसलो तर नागपूरलाही जाता येणार नाही.असा इशारा देत ईडीच्या कार्यालयाबाहेर पत्रकार परिषद घेणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022 :आयपीएलमधून “या” पाच खेळाडूंनी कमवले आहेत १५० कोटी
- “माझा राजकीय खून करण्याचा प्रयत्न केला जात आहे” जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
- “बालिश आरोप करण्यापेक्षा राऊतांनी न्यायालयात जावे”,अतुल भातखळकरांचा टोला
- एकमेव टी २० सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाचा न्यूझीलँडकडून पराभव
- “…ऑफर नाकारली म्हणून”, संजय राऊतांचे थेट उपराष्ट्रपतींना पत्र; ईडीवर केले खळबळजनक आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
