🕒 1 min read
दिल्ली: लोकसभेत सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सध्या चर्चा सत्र सुरू आहे. त्यात काल पासून अनेक दिग्गज खासदारांनी भाषण केले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहाला आणि देशाला उद्देशून भाषण करत आहेत. आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेस पक्ष, राहुल गांधी, सोनिया गांधी तसेच विरोधी पक्षांना चांगलेच धारेवर धरले आहे.
आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेसला माय लेकाचा पक्ष म्हणून नामांतर करा असे सूचित केले. तसेच त्यांनी काँग्रेसने देशात कोरोना पसरवला आहे असा आरोप केला. काँग्रेसच्या घराणेशाहीमुळे देशाचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. काँग्रेसची बऱ्याच राज्यात अजून एकदाही सत्ता आली नाही. आमचा एखादा पराभव झाला तर आम्ही अनेक महीने त्यावर चिंतन करतो, परंतु काँग्रेस एवढ्या वेळा हरून सुद्धा त्यांचा अहंकार जात असे मोदी म्हणाले.
काँग्रेसने देशात गरीबी आणि भ्रष्टाचार वाढविला. काँग्रेसमुळे काश्मिरी पंडित मारले गेले. काँग्रेसने आणीबाणीच्या काळात देशाच्या लोकशाहीचा गळा घोटाला. शिखांचा नरसंहार काँग्रेसने घडवून आणला. असे अनेक आरोप मोदींनी काँग्रेसवर केले. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार यांचे कौतुक करत त्यांच्याकडून खूप काही शिकण्याचे आहे असे म्हणत त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींना सल्ला दिला.
महत्वाच्या बातम्या:
- Praveen Kumar Death : महाभारतात ‘भिम’ साकारणारे प्रवीण कुमार काळाच्या पडद्याआड
- “वॉर्नरला खरेदी करा तो चांगले रील बनवतो” ; चाहत्यांची राजस्थान संघाला अजब विनंती
- ऐतिहासिक पाकिस्तान दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा; अनेक मोठे खेळाडू यादीत
- वर्ल्डकप संघात निवड न झाल्याने “ही” महिला क्रिकेटर आता खेळणार हॉकी
- “शिवाजी पार्कला स्मशानभूमीमध्ये…”, लतादीदींच्या स्मारकाच्या वादावर आंबेडकरांची प्रतिक्रिया

