Share

Lata Mangeshkar Biography : वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी झाली होती लता मंगेशकरांच्या करिअरला सुरुवात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गानसम्राग्नी लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी मध्य प्रदेशातील इंदोर शहरात झाला. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर कलाकार आणि गायक होते, त्यामुळे संगिताचे धडे त्यांना आपल्या वडिलांकडूनच मिळाले. लता मंगेशकर यांनी विविध भाषांत ३० हजाराहून अधिक गाणे गायले आहेत. त्यांनी करिअरला वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षात सुरुवात केल्याने तसेच सर्वाधिक गाणे गायल्याने १९७४ साली त्यांचे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंदवले गेले.

लता मंगेशकर यांचे नाव हेमा होते मात्र वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या आई वडिलांनी त्यांचे नाव बदलून लता ठेवले. लता मंगेशकर यांचे भाऊ ह्रदयनाथ मंगेशकर म्यूजिक डायरेक्टर होते. त्यांच्या बहिनी उषा मंगेशकर, आशा भोसले आणि मीना खादिकर याही गायक आहेत. लता मंगेशकर यांनी लग्न केले नाही. मात्र त्यांचे नाव भूपेन हजारिका यांच्यासोबत अनेकेदा जोडले गेले. त्यांचे नाव भारतीय सिनेसृष्टीतील महत्वाच्या गायिकांपैकी एक मानले जाते. लता मंगेशकर यांना २००१ साली त्यांना ‘भारतरत्न’ या देशाचा सर्वोच्च नागरिक सन्मानाने गौरविण्यात आले होते.

लता मंगेशकर यांचे करियर
लता मंगेशकर यांनी विविध भारतीय भाषांत ३० हजारांहून अधिक गाणे गायले आहेत. त्या संपूर्ण जगात सर्वाधिक प्रसिद्ध पार्श्व गायिका होत्या. त्या पाच वर्षाच्या असतानाच त्यांना संगिताचे धडे त्यांच्या वडिलांकडून मिळाले. त्या पाच वर्षाच्या असताना त्यांनी नाटकात अभिनेत्री म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. १९४२ साली वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यांनी वसंत जोगलेकर यांच्या मराठी चित्रपटात आपले पहिले गाणे गायले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!