Share

त्यामुळे दुसऱ्या गोलंदाजाचा शोध घेण्याची वेळ आली आहे “; सुनील गावसकरांचे भुवनेश्वर बाबतीत मोठे वक्तव्य 

Published On: 

🕒 1 min read

भारतीय क्रिकेटचे माजी दिग्गज फलंदाज आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील मनोहर गावसकर यांनी एकेकाळी भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजीची धुरा सांभाळणाऱ्या भुवनेश्वर कुमार बद्दल मोठे वक्तव्य केले आहे. भारतात स्विंग गोलंदाजी प्रथमतः करायला सुरुवात केली ती कपिल देव यांनी. त्यानंतर इरफान पठाण, झहीर खान प्रवीण कुमार यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली. या परंपरेतला अलीकडचाच गोलंदाज म्हणजे  भुवनेश्वर कुमार होय. पण गेले २ वर्षे भुवनेश्वर कुमार आपल्या फॉर्म गमावून बसला आहे. २०१२ च्या पाकिस्तानच्या भारत दौऱ्यात भुवनेश्वरने पदार्पण केले होते, याच त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात त्याने पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानच्या फलंदाजाचा त्रिफळा उडवला होता. मात्र गेले दोन वर्ष भुवनेश्वर कुमार प्रभाव टाकण्यात कमी पडतोय.

मोहमद सिराज या हैद्राबादच्या खेळाडूने २०१९ मध्ये भारतीय संघात पदार्पण केल्यामुळे भुवनेश्वर कुमारची जागा धोक्यात आली आहे. मोहमद शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्याबरोबर आता भुवनेश्वर कुमार ऐवजी मोहमद सिराज भारतीय गोलंजीची धुरा सांभाळत आहे. भुवनेश्वर कुमार बाबतीत भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावासकर यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे.

ते भुवनेश्वर कुमार बाबतीत बोलताना म्हणाले कि, ” उत्तम यॉर्कर आणि स्लो बॉल टाकण्याची भुवनेश्वर कुमारची  क्षमता आहे.” तो चेंडू दोन्ही बाजूने उत्तम रित्या वळवतो मात्र  प्रतिस्पर्धी संघ आता त्याच्या गोलंदाजीचा अभ्यास करून मैदानात उतरत आहे त्यामुळे तो सतत महागडा गोलंदाज ठरत आहे आणि त्याला मोठया प्रमाणात अपयशास सामोरे जावे लागत आहे त्यामुळे त्याने आता भारतीय संघाच्या बाहेर जावे आणि त्याचं ऐवजी वेगळा गोलंदाज शोधायची वेळ आली आहे.

         महत्वाच्या बातम्या : 

 

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!