Share

“योगी आदित्यनाथ ‘रिव्हॉल्वर’ आणि ‘रायफल’ धारी संन्याशी”, भातखळकरांनी फोटो पोस्ट करत केले कौतुक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल (४ फेब्रुवारी) गोरखपूर शहर मतदारसंघातून आपला निवडणूक अर्ज भरला. यावेळी त्यांनी शपथपत्रात आपल्याकडे जवळपास १.५५ कोटी रुपयांची संपत्ती असून स्वतःच्या नावावर एकही जमीन, घर आणि गाडी नाही. पण एक रिव्हॉल्वर आणि रायफल आहे असे नमूद केले. त्यांचा फोटो पोस्ट करत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath)यांचे कौतुक केले आहे.

“योगीजींकडे जमीन, घर अन् गाडीही नाही, पण ते रिव्हॉल्वर आणि ‘रायफल’धारी संन्यासी आहेत. त्यांना…. शास्त्र पण माहिती आहे आणि शस्त्र पण माहिती आहे. एका हातात माळा तर दुसऱ्या हातात भाला ठेवतात”, असे ट्वीट अतुल भातखळकर ( BJP leader Atul Bhatkhalkar) यांनी केले आहे.

दरम्यान योगी आदित्यनाथ यांच्याकडे असलेल्या संपत्तीपैकी बहुतांश संपत्ती ही कॅश आणि बँक बॅलेन्सच्या रुपात आहे. त्यांच्याकडे एक सॅमसंग मोबाईल फोन असून त्याची किंमत १२ हजार रुपये इतकी आहे. तसेच त्यांच्याकडे एक लाख रुपयाचे एक रिव्हॉल्व्हर आणि ८० हजार रुपयांची एक रायफल देखील आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!