Share

‘इको-बटालियन’च्या माध्यमातून मराठवाड्याचा सर्वांगीण विकास; भगतसिंग कोश्यारींचे प्रतिपादन!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: मराठवाड्याचे वनक्षेत्र कमी आहे. हे वनक्षेत्र वाढविण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. ‘इको-बटालियन’च्या सहभागातून झालेली वृक्ष लागवड आणि वृक्षांची केलेली जोपासना नक्कीच कौतुकास्पद असून वनक्षेत्र वाढविण्यामध्ये ‘इको बटालियन’ चा सहभाग महत्वपूर्ण आहे. असे अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून मराठवाड्याचा सर्वांगीण विकास साध्य करावा असे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) म्हणाले.

औरंगाबाद जिल्ह्यात सुरू असलेल्या अनेक प्रकल्पांचा आढावा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सुभेदारी विश्रामगृह येथे घेतला. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, महावितरणचे सह संचालक डॉ. मंगेश गोंदावले आदी उपस्थित होते. यावेळी इको बटालियनच्या सहकार्याने केलेली वृक्षलागवड, मानव विकास कार्यक्रम, मराठवाडा विकास मंडळ, रेड क्रॉस सोसायटीने केलेले सामाजिक कार्य, जिल्हा सैनिक कार्यालयामार्फत घेण्यात आलेले उपक्रम आदींचे सादरीकरण राज्यपाल यांच्यासमोर करण्यात आले.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले, इको बटालियन मार्फत करण्यात येत असलेले अनेक प्रयोग कौतुकास्पद आहेत. बांबू हाऊस हे देखील पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे. जिल्ह्यात सीएसआरच्या माध्यमातून निधी उभारुन करण्यात येत असलेले प्रकल्प नक्कीच इतरांसाठी अनुकरणीय ठरणार आहेत. मानव विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील सर्वच मुलींना १२ वी पर्यंतचे शिक्षण घेणे शक्य व्हावे. याकरिता गाव ते शाळा दरम्यान वाहतूकीची सुविधा उपलब्ध करुन दिल्याने मुलींच्या शिक्षणासाठी याचा लाभ होणार आहे. जिल्हा सैनिक कार्यालयामार्फत माजी सैनिकांच्या विधवेस स्वयंरोजगाराकरिता देण्यात आलेली आर्थिक मदत, नागरिक मित्र पथक, औरंगाबाद स्मार्ट सीटी बस मध्ये सेवा, एमआयडीसी मध्ये माजी सैनिकांचा वाढता सहभाग हे उपक्रम नक्कीच कौतुकास्पद असल्याचे कोश्यारी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!