Share

औरंगाबाद शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला; निवडणुकीत भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा-चंद्रकांत खैरे

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद:औरंगाबाद जिल्हा हा शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला आहे व कायम राहील. त्यामुळे शिवसैनिकांनो येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे(Chandrakant Khaire) यांनी आवाहन केले. सिल्लोड येथे शिवतेज मोहिमेस उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून आठवडाभरात संपूर्ण जिल्हा पिंजून काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. ३ फेब्रुवारी रोजी सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघाची बैठक सिल्लोड येथील शिवसेना भवन येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते.

आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने औरंगाबाद जिल्ह्यात शिवतेज संपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. यात विशेष दौरा व संघटनात्मक बैठकांचे आयोजन केले आहे. या बैठकीस शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तर रोहयो मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विशेष उपस्थित बैठका होत आहेत. सिल्लोड येथील बैठकीत खैरे म्हणाले, सोयगाव नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मतदारांनी शिवसेनेवर विश्वास टाकला. त्याबद्दल त्यांनी मतदार राजांचे आभार मानले.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेले उत्कृष्ट नियोजन व जनतेच्या पाठबळावर सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात शिवसेनेचे संघटन वाढवण्याचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. यावेळी महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार नितीन पाटील आदींसह शिवसेना नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदर्शन अग्रवाल यांनी तर उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!