🕒 1 min read
औरंगाबाद: दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. जाधव यांना नेहमीच चर्चेत राहणे पसंत आहे. आता पुन्हा एकदा माजी आमदार हर्षवर्धन जाधव(Harshawardhan Jadhav) यांनी आपल्या पत्नी विरोधात केलेल्या वक्तव्याने वातावरण चांगलेच तापवले होते. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य माजी सदस्य संजना जाधव(Sanjana Jadhav) आणि हर्षवर्धन जाधव यांच्या समर्थकांमध्ये गुरुवारी बाचाबाची होऊन मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला होता. कन्नड तालुक्यात ही घटना घडली आहे.
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची गुरुवारी कन्नड तालुक्यातील औराळा येथे सभा होती. या सभेमध्ये हर्षवर्धन जाधव यांनी नाव न घेता संजना यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर टीका केली. यावेळी तिथे उपस्थित असलेले शेरोडीचे सरपंच रमेश बोरसे, आडगावचे सरपंच ज्ञानेश्वर बोरसे, ज्ञानेश्वर निकम हे स्टेजवर वर जाऊन बसले आणि सभा संपताच त्यांनी हर्षवर्धन जाधव यांना याविषयी जाब विचारला. आणि दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू झाला. या वादावादीला धक्काबुक्कीत रुपांतर झाले. गावातील काही तरुणांनी मध्यस्थी करत वातावरण शांत केले.
मात्र या धक्काबुक्की नंतर हर्षवर्धन जाधव यांनी मी कुणाचेही नाव घेतलेले नाही. हा आपल्या अंगावर ओढून घेण्याचा एकंदरीत प्रकार आहे. असे स्पष्टीकरण जाधव यांनी दिले. तर संजय जाधव यांनी आणि आपल्याला कुठलीही माहिती नव्हती. कार्यक्रम झाल्यानंतर घडलेला प्रकाराविषयी फार उशिरा कळाले. त्यामुळे आता यावर काही प्रतिक्रिया देता येणार नाही. असे त्यांनी सांगितले. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या असलेल्या संजना जाधव यांच्यातील वाद हा सर्वश्रुत आहे. आता संजना जाधव देखील मोठ्या प्रमाणावर राजकारणात सक्रिय होतांना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या सभांमध्ये हर्षवर्धन त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
