🕒 1 min read
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांच्यावर पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील-ठाकरेंनी टीका केली आहे. इंदापूर तालुक्यात दडपशाहीचे राजकारण चालू देणार नाही, असे त्या म्हणाल्या. दत्तात्रय भरणे स्थानिक पोलीस प्रशासनाचा वापर करीत विकासकामाला अडथळा निर्माण करत आहेत असा आरोप अंकिता पाटील-ठाकरेंनी केला आहे. असे दडपशाहीचे राजकारण चालू देणार नाही असेही त्या म्हणाल्या.
राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या सदस्या भारती मोहन दुधाळ यांनी केलेल्या शिफारस करून कौठळी येथील तीन वर्ग खोल्यांसाठी 22 लाख 50 हजार रुपये विकास निधी उभा केला. त्याच कामाच्या भूमिपूजन प्रसंगी अंकिता पाटील-ठाकरेंनी बोलत होत्या. दत्तात्रय भरणेनी दडपशाहीचा वापर करून या विकास कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा अंकिता पाटील-ठाकरेंचा आरोप आहे. अशा प्रकारच्या दडपशाही चुकीची आहे असे ही त्या म्हणाल्या. यानंतर अंकिता पाटील ठाकरे यांच्या हस्ते सदर कामाचे उदघाटन करण्यात आले.
कौठळी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन ३ वर्ग खोली, माने भंडलकर वस्ती महादेव मंदिर सभामंडप, नवीन अंगणवाडी इमारत बांधकाम, भीमराव काळेल वस्ती ते बळपुडी रोड कडे जाणारा रस्त्या व गावठाणात हायमास्ट दिवा, अशा जवळपास 42 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे आज भूमिपूजन व लोकार्पण अंकिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्या भारतीताई दुधाळ यासाठी सतत पाठपुरवठा करत होत्या, असेही त्या म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या:
-
“काठी न् घोंगडं घेऊ द्या की रं”; राज ठाकरे निवडणुकीसाठी सज्ज
-
अर्थसंकल्पाचा संदेश गावोगावी पोहोचवणार’; चंद्रकांत पाटलांचे विधान
-
“ठाकरेंच्या सांगण्यावरून वाझेंची नेमणूक…” परमवीर सिहांचा धक्कादायक खुलासा
-
‘भारताने अर्थव्यवस्थेच्या बळावर जगाचे लक्ष वेधले’; पंतप्रधान मोदींचे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
