Share

अभिनेते अमिताभ दयाल यांचे निधन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूड अभिनेते आणि चित्रपट निर्माते अमिताभ दयाल (Bollywood actor and filmmaker Amitabh Dayal ) यांचे आज सकाळी म्हणजेच बुधवारी पहाटे ४.३० वाजता निधन (passed away) झाले. गेल्या तेरा दिवसांपासून ते आजारी होते. वयाच्या ५१ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. अलीकडेच अभिनेत्याची पत्नी मृणालिनी पाटील (Mrinalini Patil)  यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

दरम्यान ही बातमी समोर येताच चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. अमिताभ दयाल यांनी अमिताभ बच्चन, जॉन अब्राहम, संजय दत्त (Amitabh Bachchan, John Abraham, Sanjay Dutt) यांसारख्या अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनय गेल्या १३ दिवसांपासून आजारी होते. अभिनेत्याच्या पत्नीनेच याबद्दल सांगितले आहे. त्यांना १७ जानेवारी रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृणालिनी पाटील यांनी नुकतेच एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, ‘आम्ही त्यांचा अंत्यसंस्कार फक्त मुंबईत करू’ अमिताभ यांचे संपूर्ण कुटुंब छत्तीसगडमध्ये राहतात.

अमिताभ दयाल यांनी २०१२ मध्ये ‘रंगदारी’ आणि २०१३ मध्ये ‘धुआं’ या चित्रपटात काम केले होते. याशिवाय त्यांनी अमिताभ बच्चन, जॉन अब्राहम, संजय दत्त यांच्यासोबत ‘विरुद्ध’ चित्रपटात काम केले होते. या अभिनेत्याने २००० मध्ये मराठी दिग्दर्शिका मृणालिनी पाटील यांच्याशी लग्न केले, मात्र लग्नाच्या नऊ वर्षानंतर त्यांचे मार्ग वेगळे झाल्याची माहिती मिळाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!