Share

“… आणि माही भाई म्हणाले चिल कर ” ; युझीला आठवला माहिने दिलेला सल्ला

Published On: 

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा उत्कृष्ट फिरकी गोलंदाज युझवेन्द्र चहल सध्या त्याच्या करिअर मधील कठीण स्थितीतून जात आहे. संघात आपली जागा बनवण्यासाठी तो धडपड करत आहे. महेंद्रसिंग धोनी कर्णधार असताना युझवेंद्र चहलने भारतासाठी काही महत्वाचे सामने जिंकून दिले आहेत. महिने त्याला कठीण काळात मदत केल्याची एक घटना युझीने नुकतीच सांगितली आहे.

भारतीय फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनला युट्युब चॅनलसाठी दिलेल्या मुलाखतीत युझीने माही बद्दलचा एक किस्सा शेयर केला आहे. युझी म्हणाला ” दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय सामन्यात मी माझ्या चार ओव्हरमध्ये ६४ धावा दिल्या होत्या. क्लासेन माझ्या गोलंदाजीवर मैदानाच्या कानाकोपऱ्यात शॉट्स मारत होता. माही भाईने मला राउंड द विकेट यायला सांगितले. मी तसे केले आणि क्लासेनने मिडविकेटच्या सर्वात लांब बाऊंड्रीवर सिक्सर मारला. मग माही भाई माझ्याकडे आले. मी त्यांना विचारले ” आता काय करायचे माही भाई? ते म्हणाले काही नाही, मी असाच तुझ्याकडे आलो आहे. मला माहित आहे की आज तुझा दिवस नाहीये. आपण प्रयत्न केले, परंतु तसे होत नाहीये. जास्त विचार करू नको, तुझा चार ओव्हरचा कोटा संपव आणि चिल कर.”

६४ धाव दिलेला तो ओव्हर युझीच्या करिअर मधील सर्वात महाग ओव्हर होती. या घटनेने एक गोलंदाज म्हणून परिस्तिथी कशी सांभाळावी हे शिकवले असल्याचे युझी म्हणाला आहे. ” त्या महाग ओव्हरसाठी जर माहीने मला रागवले असते तर माझा स्वतः वरचा विश्वास उडाला असता. त्यांने ही केवळ एक मॅच आहे असे सांगितले. तुम्ही वनडेत चांगली कामगिरी केली. तुम्ही प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करू शकत नाही. इतरही लोक खेळत आहेत. कधी कधी तुम्ही क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करता तर कधी तुमच्याकडे एक दिवस नसतो हेही मला जाणवलं. मी हे देखील शिकलो की तुमचा दिवस नसताना तुम्ही खूप प्रयत्न करू नका. त्याऐवजी किफायतशीर गोलंदाजी करा आणि इतर लोकांवर विकेट घेण्यासाठी दबाव टाका.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!