Share

“गांधी कुटुंबासाठी गोवा हे फक्त वेकेशन स्पॉट”, अमित शहांचे टीकास्त्र

Published On: 

🕒 1 min read

पणजी: लवकरच गोव्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. यात राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. गोवा निवडणूक आतापासूनच अनेक कारणांनी गाजत आहे. अगोदर उत्पल पर्रीकर यांची उमेदवारी नंतर त्यांनी भाजपला दिलेली सोडचिट्ठी यावरून बरेच राजकारण गोव्यात पहावयास मिळाले. तर कधी शिवसेना खासदार संजय राऊत यांचे दावे तर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Union Home Minister Amit Shah) यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

“भाजपने गोव्यात विकास आणला आहे. गांधी कुटुंबासाठी गोवा हे फक्त सुट्टीचे ठिकाण आहे. आम्ही राज्याचा अर्थसंकल्प ४३२ कोटी (२०१३-१४ ) वरून २ ,५६७ कोटी (वर्ष २०२१ ) पर्यंत वाढवला आहे. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पायाभूत सुविधांच्या विकासावर काहीही काम केले नाही. आम्ही जे वचन दिले होते ते आम्ही पूर्ण केले आहे.” असे अमित शाह यांनी म्हटले आहे.

अमित शहा आज गोवा दौऱ्यावर असून आज त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. अमित शाहसोबतच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही याठिकाणी उपस्थित आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!