पुणे: देशात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकरणातला पारा चांगलाच चढत असल्याचे दिसत आहे. सत्तेवर येण्यासाठी विकास कामांपेक्षा दुसऱ्या पक्षाच्या चुका तसेच त्यांच्यावर आरोप करून आपला पक्ष चांगला हे दाखवणं देखील चांगलंच सुरू आहे. राजकारणाचा तो एक भागच आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून भाजप नेत्यांनी टीका करण्याची एकही संधी सोडली नाही तसेच महाविकास आघाडी मधील नेत्यांनी देखील भाजपवर आरोप करणं सोडलं नाही. अशातच आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी देखील भाजपवर हल्लाबोल केला आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील (NCP Leader Rupali Thombre Patil) त्यांच्या रोखठोक बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. वाईन विक्रीच्या निर्णयावरून भाजपकडून होत असणाऱ्या टीकेला देखील त्यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. सुपरमार्केट मध्ये वाईनविक्री हा निर्णय या आधी मध्य प्रदेश, गोवा, हिमाचल प्रदेश व इतर भाजपशासित राज्यांमध्ये झाला आहे त्याला भाजप विरोध करण्याची हिंमत करेल का, असा सवाल देखील त्यांनी विचारला होता.
थोडक्यात उत्तर द्या ५0 गुण
शेकऱ्यांना साले म्हणणारे, शेतकऱ्याना गाडी खाली चिरडवणारे, कर्मचाऱ्यांचे बँक अकाउंट हवे त्या बँकेत वळवणारे या जमाती कुठे सापडतील?
रिकाम्या जागा भरा ५० गुण#MVA सत्तेत आल्यापासून सर्वात जास्त कुणाचा जीव तडफडतोय …#सत्तापिपासू
— Rupali patil thombare (@Rupalispeak) January 29, 2022
आता पुन्हा एकदा रूपाली पाटील यांनी ट्विट करत भाजपवर हल्ला केला आहे. रूपाली पाटील ट्विट करत म्हणाल्या, शेकऱ्यांना साले म्हणणारे, शेतकऱ्याना गाडी खाली चिरडवणारे, कर्मचाऱ्यांचे बँक अकाउंट हवे त्या बँकेत वळवणारे, या जमाती कुठे सापडतील? रिकाम्या जागा भरा ५० गुण, असं म्हणत रूपाली पाटील यांनी भाजपवर टीका केली आहे. तसेच राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून कोणाचा जीव तडफडतोय, असा खोचक सवाल देखील त्यांनी विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या:
“देश हिंदुत्व विचाराने नाही तर गांधी विचाराने चालेल”, नाना पटोलेंचे प्रतिपादन
‘…आशांवर कारवाई करायला पाहिजे’; वर्षा गायकवाड यांची भाजपवर टीका
औरंगाबादेतील शहागंज येथे अद्यावत स्त्रीरोग व प्रसूती रुग्णालय उभारा; इम्तियाज जलील यांची मागणी!
“मोदींपेक्षा मोठा हिंदू कोण होईल? असा वाद…”, ओवेसींचे टीकास्त्र
“आम्ही कुणाला वाईन प्या असं म्हणू शकत नाही”, राजेश टोपेंचे वक्तव्य


