🕒 1 min read
मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole) यांनी आज काँग्रेस मुख्यालयात गांधी पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी देश हिंदुत्व विचाराने नाही तर गांधी विचाराने चालेल (The country will run not on Hindutva ideology but on Gandhi ideology) असे प्रतिपादन केले.
“राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आजच्याच दिवशी नथुराम गोडसे नामक आतंकवाद्याने हत्या केली. महात्मा गांधी संपले असे हिंदुत्ववादी व्यवस्थेला वाटत असेल पण महात्मा गांधी आजही त्यांच्या विचाराने जिवंत आहेत. आणि त्यांचे विचार भविष्यातही जिवंत राहणार. भारत देशाने तसेच संपूर्ण जगाने गांधी विचार स्विकारलेला आहे तो कधीही संपणारा नाही. त्यामुळे देश हिंदुत्वाच्या विचाराने नाही तर गांधी विचारानेच चालेल”असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
दरम्यान काँग्रेस मुख्यालयात गांधी पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस नेत्यांकडून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी नाना पटोले यांनी हे वक्तव्य केले. तसेच महात्मा गांधी यांच्याबद्दल खोटा इतिहास सांगून त्यांना खलनायक बनवण्याचा प्रयत्न केला जात असून हा अपप्रचार थोपवण्यासाठी सजग रहा, सतर्क रहा. स्वातंत्र्याच्या लढाईप्रमाणे गांधी विचाराची लढाई सुरु ठेवा, असे आवाहनही नाना पटोले यांनी केले आहे.
या देशाला गांधींजीनी अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून दिले. गांधीजींची अहिंसेची शिकवण जगाने स्विकारलेली आहे. गांधी एक व्यक्ती नसून तो विचार आहे तो विचारच देशाला तारणारा आहे. ब्रिटिशांविरोधात मोठा संघर्ष केल्यानंतर मिळालेले हे स्वातंत्र्य आज धोक्यात आल्याची परिस्थिती देशात निर्माण झाली आहे त्यामुळे स्वातंत्र व संविधान अबाधित ठेवणे ही आपली जबाबदारी असल्याचेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘…आशांवर कारवाई करायला पाहिजे’; वर्षा गायकवाड यांची भाजपवर टीका
- औरंगाबादेतील शहागंज येथे अद्यावत स्त्रीरोग व प्रसूती रुग्णालय उभारा; इम्तियाज जलील यांची मागणी!
- “मोदींपेक्षा मोठा हिंदू कोण होईल? असा वाद…”, ओवेसींचे टीकास्त्र
- “आम्ही कुणाला वाईन प्या असं म्हणू शकत नाही”, राजेश टोपेंचे वक्तव्य
- औरंगाबादच्या पाटलांचा महाराष्ट्रात धुरळा; म्हणे महापालिका निवडणुकीसाठी ‘उमेदवार बायको’ पाहिजे!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
