🕒 1 min read
मुंबई: राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे(NCP leader Amol Kolhe) यांच्या Why I Killed Gandhi या चित्रपटातील नथुराम गोडसेच्या भूमिकेवरून सध्या राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कॉंग्रेसने हा मुद्दा लावून धरला आहे. तर राष्ट्रवादीतीलही अनेक नेत्यांनी अमोल कोल्हे यांच्या या चित्रपटाला तसेच यांच्या भूमिकेला विरोध केला आहे. दरम्यान आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी ‘नथुरामला नायक दाखवून महात्मा गांधींना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न कदापी खपवून घेणार नाही’ असा गंभीर इशारा अमोल कोल्हे यांना दिला आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज काँग्रेस मुख्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नाना पटोले यांचीही उपस्थिती होती. यादरम्यान पत्रकारांनी डॉ. अमोल कोल्हे यांच्या आत्मक्लेशाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना पटोले म्हणाले की, ‘खासदार अमोल कोल्हे डॉक्टर आहेत. कलाकार म्हणून त्यांनी कोणती भूमिका करावी हे त्यांचे स्वातंत्र्य आहे पण त्यांच्यासमोर जेव्हा नथुराम गोडसेच्या भूमिकेची स्क्रिप्ट आली त्यावेळीच त्यांना समजायला हवे होते. नथुरामला नायक दाखवून महात्मा गांधींना खलनायक ठरवण्याचा जो प्रयत्न सुरु आहे तो आम्ही कदापी खपवून घेणार नाही.’ असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.
तसेच अमोल कोल्हे यांचा Why I Killed Gandhi? हा चित्रपट कोठेही प्रदर्शित होऊ नये अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. असेही पटोले यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी “राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आजच्याच दिवशी नथुराम गोडसे नामक आतंकवाद्याने हत्या केली. महात्मा गांधी संपले असे हिंदुत्ववादी व्यवस्थेला वाटत असेल पण महात्मा गांधी आजही त्यांच्या विचाराने जिवंत आहेत. आणि त्यांचे विचार भविष्यातही जिवंत राहणार. भारत देशाने तसेच संपूर्ण जगाने गांधी विचार स्विकारलेला आहे तो कधीही संपणारा नाही. त्यामुळे देश हिंदुत्वाच्या विचाराने नाही तर गांधी विचारानेच चालेल”असेही म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “देश हिंदुत्व विचाराने नाही तर गांधी विचाराने चालेल”, नाना पटोलेंचे प्रतिपादन
- ‘…आशांवर कारवाई करायला पाहिजे’; वर्षा गायकवाड यांची भाजपवर टीका
- औरंगाबादेतील शहागंज येथे अद्यावत स्त्रीरोग व प्रसूती रुग्णालय उभारा; इम्तियाज जलील यांची मागणी!
- “मोदींपेक्षा मोठा हिंदू कोण होईल? असा वाद…”, ओवेसींचे टीकास्त्र
- “आम्ही कुणाला वाईन प्या असं म्हणू शकत नाही”, राजेश टोपेंचे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
