Share

“…त्यामुळेच जन्मापुर्वीचा इतिहास इतिहासाचार्यांना माहिती नसावा”, शेलारांचा राऊतांवर हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी रोजी उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणाचा काल(२४ जाने.)विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी जोरदार समाचार घेतला होता. तद्पश्चात शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच भाजप हा पक्ष जन्माला येण्याआधी मुंबईत आमचा नगरसेवक होता, आमदार होते, असा दावा राऊतांनी केला होता. दरम्यान, वक्तव्यावरून आता भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार(Ashish Shelar) यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.

यासंदर्भात आशिष शेलार यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘शिवसेना जन्म सन 1966 साली झाला. तर शिवसेनेचे इतिहासाचार्य खा. संजय राऊत यांचा जन्म सन 1961 साली झाला. त्यामुळे जन्मापुर्वीचा इतिहास इतिहासाचार्यांना माहिती नसावा म्हणून सांगतो. आमचे दोन नगरसेवक श्री कानिटकर आणि कोरडे हे 1957 साली मुंबईत निवडून आले.’

तसेच पुढे ते म्हणाले की,‘सन 1967 ला हशु अडवाणी चेंबूर मधून विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले. तुमचे पहिले आमदार वामनराव महाडिक 1970 साली परळ मधून जे निवडून आले तेही आमच्या पाठींब्यावर.त्यामुळे उगाच सोईने इतिहास उगळू नका. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत हिंदुत्ववाच्या विचारांसाठी युतीत”आम्ही गर्व से कहो” म्हणत होतो. आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मात्र या जाज्वल्य इतिहासाच्या फुलांचे निर्माल्य झाले वाटतेय. इतिहासाला अर्थ केवढा ज्याच्या त्याच्या समजूती एवढा.’

दरम्यान, ‘भाजपच्या जन्म तारखेचा दाखला देवेंद्र फडणवीसांनी आणावा. जनता पक्षाचे पतन झाल्यावर १९८० च्या दशकात भाजपचा जन्म झाला आहे. तर शिवसेनेचा जन्म हा १९६९ साली झाला. शिवसेनेचा पहीले महापौर मुंबईमध्ये डॉ हेमचंद्र गुप्ते हे कधी झाले. त्यावेळी आमचे किती नगरसेवक निवडून आले होते. या संदर्भातील एक अभ्यास शिबीर आम्ही रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठाणमध्ये ठेऊ. कोणाला त्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर ते येऊ शकतात. शिवसेनेते पहिले आमदार वामनरान महाडिक देखील त्याच काळात निवडणून आले. भाजपच्या जन्माआधी आमचे वाघ मुंबईतून निवडून आलेले आहेत. देवेंद्र फडणवीसांचा तेव्हा मुंबईशी, महाराष्ट्राच्या राजकारणाशी सबंध नसेल कारण या सर्व गोष्टी फडणवीस यांच्या जन्माआधीच्या आहेत’, असे राऊत म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!