Share

सिल्लोड येथील बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक शिवसैनिकांना प्रेरणा देणारे शक्तीस्थळ ठरेल-अब्दुल सत्तार

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: सिल्लोड येथे उभारण्यात येणारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक तमाम शिवसैनिकांना प्रेरणा देणारे एक शक्तीस्थळ असेल असे प्रतिपादन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांनी रविवारी (दि.२३) सिल्लोड येथे केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून सिल्लोड येथील बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackrey) चौकात त्यांच्या स्मारकाचे कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी सत्तार बोलत होते.

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त सिल्लोड नगर परिषदेच्या माध्यमातून रविवारी येथील स्व. बाळासाहेब ठाकरे चौक येथे स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक व सुशोभीकरणाचे भूमिपूजन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी होते तर मुर्डेश्वर संस्थानचे पिठाधिश प.पु.ओंकारगिरी महाराज, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मराठवाड्याील सिल्लोड येथील हे सर्वाधिक सुंदर स्मारक असेल. असे प्रतिपादन यावेळी सत्तार यांनी केले. तसेच येणाऱ्या वर्षीपर्यंत हे स्मारक पूर्णपणे साकारण्यात येईल. येणारी बाळासाहेबांची जयंती याच ठिकाणी साजरी केली जाईल असा विश्वास व्यक्त त्यांनी यावेळी व्यक्त केला. बाळासाहेब ठाकरे चौक येथे स्मारक व सुशोभीकरण करण्यासाठी एक मताने ठराव घेतला. याबाबत नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, नगरसेवक व अधिकाऱ्यांचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आभार मानले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!