🕒 1 min read
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत चौथे स्थान पटकावले आहे. इंडिया टुडे(India Today)च्या मूड ऑफ द नेशनने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या यादीत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक पहिल्या, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दुसऱ्या, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन तिसऱ्या तर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन पाचव्या स्थानी आहेत. मात्र यावरूनच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांनी टोला लगावला आहे.
कोणत्या निकषावर मुख्यमंत्री पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये आले? कारण गेली सव्वा दोन वर्ष ते एकदाही मंत्रालयात आले नाहीत. ते लोकांसठी गेल्या ८०-९० दिवसांपासून उपलब्ध नाहीत. पंतप्रधानांनी बोलावलेल्या कोरोनाच्या आढावा बैठकीला ते उपस्थित नसतात आणि महापालिकेच्या कार्यक्रमाला उपस्थित असतात. कारण त्यांचा महाराष्ट्र फक्त मुंबई आहे. मुंबईबाहेर त्यांना महाराष्ट्र माहीत नाही अशा वेळी त्यांना पाचवा क्रमांक कसा मिळतो? असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
दरम्यान यावेळी चंद्रकांत पाटील यांनी पमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील वाढत्या कोरोना संदर्भात बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहण्याची इच्छाही व्यक्त केली. तसे शक्य न झाल्यास अजितदादांना पत्र लिहून शाळा सुरू कराव्यात आणि शाळा सुरू करण्यासाठीचे नियम काटेकोरपणे करावेत अशा सूचना पत्रात करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Goa Elections : मनोहर पर्रीकरांच्या पुत्राची अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा!, भाजपवर साधला निशाणा
- दाक्षिणात्य चित्रपट ‘आरआरआर’च्या रिलीजचा मुहूर्त ठरला
- अभिनेता सुशांतच्या वाढदिवशी रिया चक्रवर्तीची पोस्ट! म्हणाली, “तुझी खूप…”
- नाना पटोलेंनी अपशब्द वापरलेला ‘गावगुंड मोदी’ सापडला, मात्र…
- पद्मश्री कैलाश खेरने आयुष्य संपवण्याचा का घेतला होता निर्णय; जाणून घ्या

