Share

नाना पटोलेंनी अपशब्द वापरलेला ‘गावगुंड मोदी’ सापडला, मात्र…

Published On: 

🕒 1 min read

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या मोदींबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातीलचं नाही तर देशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. “मी मोदीला शिव्या देऊ शकतो, मारू शकतो”, अशा प्रकारचं वक्तव्यं नाना पटोले यांनी केलं होतं. यावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर नाना पटोले यांनी मोदी नावाचा गावगुंड आहे त्याच्याबद्दल बोलत असल्याचे स्पष्टीकरण दिले होते.

दरम्यान, हा गावगुंड समोर आला आहे. उमेश घरडे असे त्याच नाव असून भंडारा पोलीस त्याची चौकशी करत आहेत. उमेश घरडे हा लाखणी तालुक्यातील गोंदी गावचा रहिवासी आहे. नाना पटोलेंनी उल्लेख केलेला मीच तो गावगुंड आहे, असे म्हणत उमेश घरडे नावाच्या व्यक्तीने माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस समर्थित वकील सतीश उके यांनी या तथाकथित गावगुंड मोदीला पत्रकारांसमोर आणले आहे. मात्र पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना उमेश घरडेला चांगलाच घाम फुटला. त्याने अनेक प्रश्नाचे उत्तर देणे टाळले. त्यामुळे नाना पटोलेंनी उल्लेख केलेला गावगुंड हाच आहे की केवळ हे एक थोतांड आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

काय म्हणाला गावगुंड मोदी?

“मी दारू विकत होतो, दारू पितो, माझी पत्नी मला सोडून गेलेली आहे. मी नाना पटोले यांना दारूच्या नशेत शिव्या दिल्या आणि त्यांच्या विरोधात प्रचार केला होता. तसेच २०२० पासून मला मोदी असं टोपण नाव पडलं आहे,” असे उमेश घरडे यांनी म्हटले आहे.

एकही गुन्हा किंवा तक्रार नोंद नाही

पोलिसांनी अटक केलेल्या या कथित मोदी उमेश घरडे विरोधात एकही गुन्हा किंवा तक्रार दाखल नाही. त्यामुळे त्याला गावगुंड म्हणायचे कसे, असा पेच पोलिसांसमोर निर्माण झाला आहे. पोलिसांनी उमेश घरडे याची चौकशी करून तसा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!