Share

अभिनेता सुशांतच्या वाढदिवशी रिया चक्रवर्तीची पोस्ट! म्हणाली, “तुझी खूप…” 

Published On: 

मुंबई : बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत (sushant singh rajput)चा आज ३६ वा वाढदिवस आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याच्या आठवणींना उजाळा देत फोटो, व्हिडीओ शेअर करत आहेत. तसेच सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने देखील (Rhea Chakraborty) त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री रिया चक्रवर्तीने तिच्या इंस्टाग्रामवर त्याच्यासोबतचा एक थ्रोबॅक व्हिडीओ पोस्ट केला आहे. तसंच ‘तुझी खूप आठवण येतीय’ असं त्यावर ओळी लिहून शेअर केले आहे. तसेच तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर त्याच्यासोबत छानसा व्हिडीओ पोस्ट करुन त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने व्हिडीओला पिंक फ्लॉइडचे ‘विश यू विअर हिअर’ हे गाणं लावलं आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर काही महिन्यांनी रिया चक्रवर्तीला अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. सुशांत सिंग राजपूत १४ जून २०२० रोजी मुंबईतील त्याच्या घरी मृतावस्थेत आढळून आला, त्याच्या मृत्यूची चौकशी सीबीआयने केली, ज्यांनी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांची तसेच सुशांतच्या काही कर्मचाऱ्यांची चौकशी केली. रिया आणि तिचा भाऊ सौविक यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ड्रग्ज तपासात अटक करण्यात आले होते.

 

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!