मुंबई : दाक्षिणात्य एनटीआर, रामचरण (Jr NTR, Ram Charan) आणि आलियाच्या ‘आरआरआर’ चित्रपटाच्या (RRR Movie Release Date) प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला आहे. आता लवकरच या चित्रपट पाहण्याचा योग प्रेक्षकांना मिळणार आहे. नेमक्या कोणत्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार याची प्रतिक्षा होती.
दरम्यान एसएस राजमौलीचा (SS Rajmaouli) हा बहुचर्चित सिनेमाबद्दल माहिती अशी आहे की, येत्या १८ मार्चला रिलीज करण्याची आमची तयारी असल्याचे निर्मात्यांकडून सांगण्यात आले आहे. तसेच कोरोनाचा (Corona) प्रदुर्भाव पाहता हा चित्रपट येत्या २८ एप्रिलला देखील रिलीज होण्याची शक्यता आहे. अशा दोन तारखा देण्यात आल्या आहेत.
ऐतिहासिक चित्रपट ‘बाहुबली’ ज्या दिग्दर्शकाने बनवलेला आहे, त्याच म्हणजे एसएस राजमौली यांच्याच दिग्दर्शनात बनलेला हा चित्रपट आहे. त्यामुळे या चित्रपटाची प्रेक्षाकांमध्ये मोठी उत्सुकता पहायला मिळत आहे. राजमौली यांच्या बाहुबली चित्रपटाने जे रेकॉर्ड बनवले आहे, त्याबद्दल आजवर चर्चा होत आहेच. त्यांचा हा चित्रपट बाहुबलीचे रेकॉर्ड तोडेल अशी अपेक्षा केली जात आहे.
या चित्रपटात मुख्य भूमिकेत दाक्षिणात्य सुपरस्टार एनटीआर, सुपरस्टार रामचरण आणि अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. बॉलिवूडमधून आलीय भटच नाही तर सुपरस्टार अजय देवगणही (Ajay Devgn) या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे. यामुळे या चित्रपटाचा ट्रेलर आधीच रिलीज झाला आहे.
#RRRMovie on March 18th 2022 or April 28th 2022. ???????? pic.twitter.com/Vbydxi6yqo
— RRR Movie (@RRRMovie) January 21, 2022
मात्र देशात पुन्हा कोरोनाची तिसरी लाट आल्याने या चित्रपटाच्या रिलीजवरही टांगती तलवार असल्याचे दिसून येत आहे. कारण तिसऱ्या लाटेत पुन्हा मोठी रुग्णवाढ होत असल्याने देशातील अनेक राज्यात काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे रिलीज डेट मागेपुढे होण्याची शक्यता आहे. या चित्रपटातील जबरदस्त अॅक्शनची आणि गाण्यांची जास्त चर्चा आहे. खासकरून एनटीआर आणि रामचरण यांचा सोबत केलेला डान्स तर सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजला. तसेच चित्रपट वेळेत रिलीज होणार की आणखी काही बदल होणार हा येणार काळ सांगेल.
महत्वाच्या बातम्या:
- “गोव्यात महाविकास आघाडी निर्माण होणार नाही”, संजय राऊतांनी केला खुलासा
- भाजपवाले कधीपासून गांधीवादी झाले? शरद पवारांची खोचक टीका
- गोवा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने जाहीर केली उमेदवारांची यादी
- “राम-रावणाच्या भूमिकेत रावणाची भूमिका करणाऱ्याने सीतेचं अपहरण केलं असं होत नाही”, शरद पवारांनी केले अमोल कोल्हेंचे समर्थन
- पर्रिकरांनी पणजीतून उमेदवारी अर्ज भरला, तर शिवसेना त्यांना पूर्णपणे पाठिंबा देईल- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

