Share

थकीत वीजबील प्रकरणात महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण सावधान; आता दाखल होणार फौजदारी गुन्हा..!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद:महावितरणच्या कर्मचाऱ्यांना काही थकबाकीदार ग्राहकांकडून होणाऱ्या शिवीगाळ, धक्काबुक्की, मारहाण तसेच कार्यालयांच्या तोडफोड प्रकरणी महावितरणने गंभीर दखल घेतली असून संबंधित व्यक्तींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाईसाठी उच्चस्तरावरून तसेच विधी विभागाकडून विशेष पाठपुरावा करण्यात येत असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देखील वीजग्राहकांच्या सेवेत अहोरात्र कर्तव्य बजावणारे महावितरणचे अभियंते, कर्मचारी सध्या गंभीर आर्थिक संकटामुळे थकबाकीदारांकडून वीजबिलांची वसूली व नाईलाजास्तव वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करीत आहेत. मात्र वर्षानुवर्ष वीजबिल थकविणाऱ्या ग्राहकांकडून महावितरणच्या कर्मचार्‍यांना शिवीगाळ, मारहाण तसेच कार्यालयांमध्ये जाऊन तोडफोड करण्याचे प्रकार सुरु आहेत. शासकिय कामात अडथळा आणणे, सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणे किंवा कार्यालयांची तोडफोड करणे आदी प्रकरणांमध्ये भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांन्वये शिक्षेची तरतूद आहे.

अभियंता व कर्मचाऱ्यांना आपले शासकीय कर्तव्य बजावता यावे यासाठी शिवीगाळ व मारहाणीच्या प्रकरणांमधील व्यक्तींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाई करण्यासाठी महावितरणच्या उच्चस्तरावरून पाठपुरावा सुरु करण्यात आला आहे. सद्यस्थितीत वीजबिलांची थकबाकी सुमारे ६५ हजार कोटींवर असल्याने बिलांचा वेळेत भरणा न करणाऱ्या थकबाकीदारांचा वीजपुरवठा नियमानुसार खंडित करण्याची कारवाई सुरू आहे.

महावितरणचे अभियंते, अधिकारी व कर्मचारी थकबाकीदारांकडे जाऊन वीजबिलांची थकीत रक्कम भरण्याची विनंती करीत आहेत. मात्र ती अव्हेरून महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण करण्यात येत आहे. अशा अनेक प्रकरणांमध्ये महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी थेट संवाद साधून विचारपूस करीत संबंधित अभियंता व कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविले आहे. वीजग्राहकांनी देखील थकबाकीचा भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!