🕒 1 min read
सोलापूर: राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (ST Workers Strike) सुरू आहे. त्याच सोबत एसटी कर्मचारी संपावर आहेत त्यामुळे काम बंद असल्याने त्यांचे पगार देखील बंद आहेत. अशा परिस्थितीमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचे मोठे नुकसान होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पगार नसल्याने घर चालवणे त्याच सोबत शिक्षणासाठी देखील पैसे नाहीत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे.
वेतन बंद असल्याने घर चालवणे, मुलांचे शिक्षण आणि खर्चायला देखील पैसे नसल्याने संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्याच्या २० वर्षीय मुलाने टोकाचे पाऊल उचलले आहे. आर्थिक संकट कोसळल्याने २० वर्षीय अमर माळी याने राहत्या घरी आत्महत्या केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
अमरचा मृतदेह दुपारी चार वाजेच्या सुमारास सिव्हिलमध्ये आणण्यात आला. यावेळी कुटुंबियासह इतरांना अश्रूंचा बांध फुटला. सोलापूर (Solapur) आगारात मृत अमरचे वडील तुकाराम माळी हे २००० मध्ये एसटी महामंडळात चालक म्हणून रुजू झाले होते. अल्प वेतनावर ते कार्यरत होते. त्यांना दोन मुले पत्नी आणि आई यासह भाऊ असा परिवार आहे. त्यांची दोन्ही मुले विज्ञान शाखेत शिक्षण (Education) घेत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
-
कॉंग्रेसची ‘पोस्टर गर्ल’ भाजपच्या वाटेवर; प्रियांका मौर्य यांचा कॉंग्रेसला धक्का
-
राणीच्या बागेत १०६ कोटींचा घोटाळा; भाजप आमदार कोटेचा यांचा आरोप
-
भाजपने नाकारली पणजी उमेदवारी; उत्पल पर्रीकर म्हणाले, “माझी भूमिका लवकरच…”
-
कंगनानं शेअर केला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घराचा फोटो!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
