मुंबई: गोवा विधानसभा (Goa Assembly elections) निवडणुकींसाठी भाजपने ३४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात पणजीमधून उत्पल पर्रिकरांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. मात्र उत्पल पर्रिकरांना ( Utpal Parrikar ) भाजपने अन्य दोन जागांचा पर्याय दिला आहे. त्यामुळे ते काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले असतानाच उत्पल पर्रीकरांनी यावरच प्रतिक्रिया दिली आहे.
मी पणजीवरच ठाम आहे. अन्य पर्यायांना काही अर्थच नाही. माझी भूमिका लवकरच माध्यमांसमोर मांडेल, असे उत्पल पर्रिकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता उत्पल पर्रीकर अपक्ष लढणार असल्याचेही म्हटले जात आहे. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही उत्पल पर्रीकर अपक्ष लढले तर त्यांना साथ दिली जाईल असे म्हटले होते. त्यामुळे आता ते अपक्षच लढणार का, याकडेही सर्वांचे लक्ष आता लागले आहे.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत पणजीतून बाबूश मोन्सेरात निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर उत्पल हे आमच्या परिवारातील आहेत. त्यांना दोन जागांची ऑफर दिली होती. त्यातील एक जागा त्यांनी नाकारली. दुसऱ्या जागेबाबत त्यांच्याशी चर्चा सुरू आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच पर्रिकरांच्या कुटुंबाला भाजपने नेहमीच सन्मान दिला आहे. असेही ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- कंगनानं शेअर केला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घराचा फोटो!
- अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “बेटी बचाव, बेटी पटाव…”
- ‘या’ अपयशामागील कारणमिमांसा भाजप नेतृत्वाने समजून घ्यावी; रोहित पवारांचा भाजपला टोला!
- गोवा विधानसभा निवडणूक: भाजपने केली ३४ उमेदवारांची यादी जाहीर; उत्पल पर्रिकरांना नाकारली पणजी उमेदवारी
- राज्यात महाविकासआघाडीने केला भाजपचा सुपडा साफ; रोहित पवारांची रोखठोक पोस्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

