Share

कंगनानं शेअर केला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घराचा फोटो!

Published On: 

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. ती राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर नेहमीच आपलं मत मांडताना दिसते. आपल्या बिनधास्त स्वभावामुळे कंगना नेहमीच सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या टीकेलाही समोरं जावं लागतं. तिने एक फोटो शेअर केल्याने पुन्हा चर्चेत आली आहे.

दरम्यान कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम (Instagram) स्टोरीवर काही मुख्यमंत्र्यांच्या (CM’s houses) घरांचे फोटो शेअर केले आहेत. कंगनानं शेअर केलेल्या या फोटोमध्ये मायावती, (Mayawati) अखिलेश यादव ( Akhilesh) आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Minister Yogi Adityanath) यांच्या घरांचं कोलाज आहे. या तीनही घरांतील फरक स्पष्ट दिसत आहे. कंगनानं हा फोटो का शेअर केला, तसेच फोटोत दिसत असलेल्या फरकामुळेच सोशल मीडियावर (social media) प्रचंड चर्चेत आला आहे.

कंगना रणौत नेहमीच भाजपला समर्थन देताना दिसते. ती अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना समर्थन देतानाच त्यांच्या कामाचं कौतुकही करताना दिसते. विशेष म्हणजे तिनं हा फोटो शेअर करत योगी आदित्यनाथ यांना समर्थन दिलं आहे. कंगनानं शेअर केलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी ट्विटर अकाउंटवर बंदी आणल्यानंतर कंगना रणौत इन्स्टाग्रामवर बरीच सक्रिय असलेली दिसून येते. बऱ्याचदा ती इन्स्टाग्रामवरून राजकीय मुद्द्यांवरही भाष्य करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशला गेलेल्या कंगनानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेटही घेतली होती. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!