🕒 1 min read
मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या मोदींबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. नाना पटोले म्हणाले होते, मी मोदीला शिव्या देऊ शकतो, मारू शकतो, अशा प्रकारचं वक्तव्यं त्यांनी केलं होतं. मात्र यावर स्पष्टीकरण देताना पटोले म्हणाले, मोदी नावाचा गावगुंड आहे त्याच्याबद्दल बोलत असल्याचे नाना पटोले म्हणाले. मात्र भाजप आक्रमक झाली आहे.
नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अशोभनीय वक्तव्य केले आहे. नाना पटोले यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच महाराष्ट्र पोलिसांनी नाना पटोले यांच्या विरोधात FIR दाखल करून घेण्यास सूचना द्यावी, अशी मागणी मुंबई भाजपा शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आमदार अतुल भातखळकर आदी भाजप नेत्यांनी पटोलेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत जोरदार टीका केली आहे.
पटोले यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्याकरिता मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वात मुंबई भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल कोश्यारी यांची आज राजभवन येथे जाऊन भेट घेतली. यावेळी निवेदन देताना बुधवार, १९ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत पटोले यांच्यावर कारवाई झाली नाही तर चर्चगेट येथील गांधीजी यांच्या पुतळ्याजवळ उपोषणाला बसणार असल्याचा इशारा मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी राज्यपाल यांच्या भेटी दरम्यान दिला.
महत्वाच्या बातम्या:
-
‘मोदींच्या हत्येच्या कटाला राहुल गांधींची सहमती?’; चित्रा वाघ यांचा सवाल
-
अक्षयचा ‘बच्चन पांडे’ चित्रपट होणार चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित; जाणून घ्या तारीख
-
‘नाना पटोलेंची जीभ छाटा १ लाख मिळवा’; भाजप नेत्याने दिली धमकी
-
‘फडणवीसांना काही बरे-वाईट झाले तर…’; चंद्रकांत पाटलांचा मलिकांवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
