Share

‘फडणवीसांना काही बरे-वाईट झाले तर…’; चंद्रकांत पाटलांचा मलिकांवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: सध्या राज्यात चांगलेच राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आक्षेपार्ह वक्तव्यं केले त्यावरून कॉंग्रेस आणि भाजपमध्ये (Congress-BJP) वाद पुन्हा निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कॉंग्रेसवर तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

भाजप नेते चंद्रकांत पाटील नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना म्हणाले होते, जो न्याय नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावेळेस केला होता आता तोच न्याय नाना पटोले यांच्यावेळेस करणार का, असा सवाल महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे. तसेच नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना काशीचा घाट दाखवतो असे वक्तव्यं केले होते, या व्यक्तव्याचा देखील चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला आहे.

पाटील म्हणाले, शरद पवारांवर (Sharad Pawar) बोलणार्‍या फडणवीसांना यापूर्वी कात्रजचा घाट दाखवला होता आणि आताही बोलत राहिले तर शरद पवार काशीचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला होता. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीसांना नवाब मलिक काशीचा घाट दाखवणार आहेत. देवेंद्र फडणवीसांना काही बरे वाईट झाले तर त्याची सूत्रे नवाब मलिकांकडे जात आहेत अशा प्रकारची एक सावधगिरीची तक्रार भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केली पाहिजे, अशी सूचना पाटील यांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिली.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!