Share

‘मोदींच्या हत्येच्या कटाला राहुल गांधींची सहमती?’; चित्रा वाघ यांचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. मी मोदीला मारू शकतो, शिव्या देऊ शकतो, असं वक्तव्यं नाना पटोले यांनी केलं होतं. मात्र हे मोदी म्हणजे एक गावगुंड असल्याचे स्पष्टीकरण पटोले यांनी दिले असले तरी देखील आता भाजप आक्रमक झाली असून नाना पटोले तसेच कॉंग्रेसवर जोरदार टीका सुरू केली आहे.

भाजप (BJP) पक्षाच्या नेत्यांकडून टीका तर होत आहेच मात्र त्याच सोबत आता नाना पटोले यांना धमक्या देखील दिल्या जात आहेत. भाजप नेते अनिल बोंडे यांनी तर नाना पटोले यांचा पंजा छाटण्याची धमकी दिली आहे. तसेच भाजप युवा मोर्चाने नाना पटोले यांची जीभ छटणाऱ्याला एक लाखाचे बक्षिस दिले जाईल, अशी जाहीर धमकीच देण्यात आली आहे.

अशातच आता भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी देखील कॉंग्रेसवर टीका केली आहे. नाना पटोले यांच्या वक्तव्यावर काँग्रेस हायकमांड गप्प का आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटासाठी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची सहमती आहे काय? पंजाबमध्ये फेल झालेला कट महाराष्ट्रात शिजतोय का? आमचा महाविकास आघाडी सरकारच्या पोलिसांवर विश्वास नाही. या प्रकरणाचा तपास केंद्रीय यंत्रणांकडे दिला जावा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी ट्विटरद्वारे केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!