🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूडचा फिट अभिनेता म्हणून अक्षय कुमार याची (Akshay Kumar)ओळख आहे. सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘बच्चन पांडे’ (‘Bachchan Pandey’ movie) मुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारचा चित्रपटातील लूक समोर आला होता. अक्षयचा नवा लूक पाहून चाहते प्रचंड खूश झाले आहेत. तसेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची (released) तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान अक्षय कुमारने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर (Tweet) ‘बच्चन पांडे’ चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर केले आहे. ‘चित्रपटात अॅक्शन, कॉमेडी, रोमॅन्स आणि ड्रामाचा नक्कीच असणार आहे. चित्रपट होळीच्या मुहूर्तावर, म्हणजेच १८ मार्च २०२२ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे’ या आशयाचे ट्वीट अक्षय कुमारने केले आहे. त्यासोबतच त्याने चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर केले आहे.
Action ✔️
Comedy ✔️
Romance ✔️
Drama ✔️L-O-A-D-I-N-G this Holi!#SajidNadiadwala’s #BachchanPandey in cinemas on March 18,2022@farhad_samji @kritisanon @Asli_Jacqueline @ArshadWarsi @TripathiiPankaj @prateikbabbar @saharshshukla6 #AbhimanyuSingh @NGEMovies @WardaNadiadwala pic.twitter.com/k5rw0iOLCg
— Akshay Kumar (@akshaykumar) January 18, 2022
यापूर्वी हा चित्रपट २६ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचे ही म्हटले जात आहे. आता हा चित्रपट होळीच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १८ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तसेच अभिनेत्री क्रिती सेनॉन, अर्शद वारसी, जॅकलीन फर्नांडिस, पंकज त्रिपाठी यांच्याही भूमिका विशेष आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
-
पटोले म्हणतात, मोदी नावाच्या गावगुंडाला पकडले, पोलिस म्हणतात कोणालाही अटक नाही…
-
औरंगाबाद जिल्ह्यात पोकरा योजना; ३२७ गावांसाठी १३० कोटींचा आराखडा!
-
आता चिरंजीवी यांची मुलगी श्रीजी घेणार घटस्फोट? जाणून घ्या नेमकं प्रकरण
-
“हे मरण्या-मारण्याचे तुमच्या काँग्रेस पक्षाचेच संस्कार”, चंद्रकांत पाटलांचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
