🕒 1 min read
मुंबई: राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या (Corona Cases) झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्याच सोबत कोरोनाचा व्हेरीअंट ओमायक्रॉन (Omicron) देखील वेगाने पसरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अधिकच चिंता वाढली आहे. मुंबई पुण्यात कोरोना सोबतच ओमायक्रॉनचे देखील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. त्यामुळे कोरोना सोबतच ओमायक्रॉनची देखील लाट आली आहे का, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
मुंबईमध्ये (Mumbai) कोरोना तसेच ओमायक्रॉनचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. या बाबत बोलताना टास्क फोर्सच्या सदस्य असलेले डॉ. शशांक जोशी (Dr. Shashank Joshi) यांनी आपले मत व्यक्त केले आहे. सद्यस्थितीत मुंबईत करोनाचा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनचा प्रभाव उच्चांकी पातळीवर आहे. आज, शुक्रवारी साधारण ११ हजार रुग्ण आढळतील, असा अंदाज डॉ. जोशी यांनी व्यक्त केला आहे.
Omicron Mumbai Peak time
11 k cases anticipated today with changing norms( TPR will vary ) focus on hospitalization, oxygen, icu and mortality.Stay connected with your doctor .Stay safe Mask and Vaccinate????— Dr. Shashank Joshi (@AskDrShashank) January 14, 2022
दोन दिवसांपूर्वी मुंबईत २१ ओमायक्रॉनबाधित रुग्ण आढळले होते. दरम्यान, राज्य कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी ओमायक्रॉनच्या प्रादूर्भावासंबंधी वेगळाच अंदाज व्यक्त केला आहे. मुंबईत ओमायक्रॉनचा अधिक जोर दिसून येत असून, आज ११ हजार रुग्णांची नोंद होऊ शकते, असे ट्विट त्यांनी केले आहे. त्यामुळे सद्यपरिस्थितीत रुग्णालयांतील स्थिती, ऑक्सिजन, आयसीयू यावर अधिक लक्ष केंद्रीत केले जात आहे. डॉक्टरांशी संपर्कात राहा, मास्क वापरा आणि लसीकरण करून सुरक्षित राहा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- काँग्रेस सदस्य नोंदणी अभियान मोठी चळवळ म्हणून उभी करा; काँग्रेस सरचिटणीस ओझांचे आवाहन..!
- अचानक ठरलेल्या लग्नाबद्दल सांगताना, मोहित रैनाला झाली पहिल्या भेटीची आठवण
- ‘कॉंग्रेसचा उत्तर प्रदेशमधला प्रयोग महाराष्ट्रातही करणार’; नाना पटोलेंची घोषणा
- औरंगाबाद मनपात गुंठेवारीच्या ४ हजार फाईली जमा; ४५ कोटींचा महसूल गोळा!
- ‘बरं झालं यावेळी लॉकडाऊनची घोषणा केली नाही’; नवाब मलिकांचा मोदींना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
