Share

औरंगाबाद मनपात गुंठेवारीच्या ४ हजार फाईली जमा; ४५ कोटींचा महसूल गोळा!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: शहरातील गुंठेवारी भागातील डिसेंबर २०२० पर्यंतची बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार चार महिन्यांपासून महापालिका वास्तुविशारदांमार्फत फायली जमा करून घेत आहे. आत्तापर्यंत सुमारे ४ हजार ९२१ मालमत्ताधारकांनी महापालिकेकडे फायली जमा केल्या आहेत. त्यातील निम्म्या फायली मंजूर झाल्या असून, सुमारे ४५ कोटी ७३ लाख १७ हजार रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत.

गुंठेवारी भागात इमारतींचा व्यावसायिक वापर करणारे मात्र महापालिकेला जुमानत नसल्याचे चित्र आहे. प्रशासनाने ३७३ जणांना नोटिसा बजावल्या आहेत. यातील फक्त दोन जणांनी फायली दाखल केल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारने ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी गुंठेवारी कायद्यात दुरुस्ती केली आहे. त्यानुसार महापालिकेने शहरातील बेकायदा बांधकामे नियमित करून घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी वॉर्ड कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. फायली तयार करण्यासाठी ५१ वास्तू विशारदांचे पॅनल तयार करण्यात आले आहे.

सप्टेंबरपासून गुंठेवारी नियमितीसाठी वास्तू विशारदांकडून फायली दाखल होण्यास सुरुवात झाली. गेल्या चार महिन्यात सुमारे चार हजार ९२१ मालमत्ताधारकांनी फायली दाखल केल्या असून, त्यापैकी दोन हजार ५४८ फायली मंजूर करण्यात आल्या आहेत. अद्यापही नागरिक फायली दाखल करत आहेत. दरम्यान प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी गुंठेवारी मोहिमेला ३० जानेवारी २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ देताना त्यांनी ३७३ व्यावसायिक मालमत्ताधारकांना मात्र शेवटची मुदतवाढ असल्याचे स्पष्ट केले आहे. या व्यावासायिक मालमत्ताधारकांना गेल्या महिन्यात नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. पण त्या नोटिसांची दखल मालमत्ताधारकांनी घेतलेली नाही. आत्तापर्यंत केवळ दोन जणांनी चलान घतले असले तरी पैसे महापालिकेकडे भरलेले नाहीत.

कोट्यवधींचा मिळू शकतो महसूल

निवासी मालमत्ताधारकांकडून महापालिकेच्या तिजोरीत आत्तापर्यंत सुमारे ४५ कोटी ७३ लाख १७ हजार रुपये जमा झाले आहेत. व्यावयासित मालमत्ता नियमित झाल्यास त्यातून महापालिका कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. व्यावसायिक मालमत्तांना निवासी मालमत्तेप्रमाणे सूट लागू नाही

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!