🕒 1 min read
मुंबई: सध्या देशात निवडणुकांचे वारे वाहताना दिसत आहे. त्यामुळे सर्वच पक्ष निवडणुकांच्या तयारीत लागलेले दिसत आहेत. नवनवीन प्रयोग करून सामान्य जनतेला आपल्या पक्षाकडे आकर्षित करणं देखील सुरू आहे. कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी असाच एक प्रयोग सध्या उत्तर प्रदेशमध्ये राबवायला सुरू केला आहे. लडकी हूँ, लड सकती हूँ हे अभियान प्रियंका गांधी सध्या उत्तर प्रदेशमध्ये राबवताना दिसत आहेत.
प्रियंका गांधी यांचा हाच प्रयोग आता महाराष्ट्रातही करणार अशी घोषणा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. काँग्रेसने महिलांचा कायमच सन्मान करत त्यांना समान संधी दिली आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल या महत्वाच्या पदावर काँग्रेसने महिलांना संधी दिली आहे. महिलांना राजकारणात महत्वाची जबाबदारी देण्याची काँग्रेसची परंपरा आहे, असं नाना पटोले म्हणाले.
पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत ४० टक्के महिलांना उमेदवारी देऊन प्रियंका गांधी यांनी नवा आदर्श घालून दिला आहे. ‘लडकी हूँ’ लड सकती हूँ’, अशी घोषणा देत महिला सक्षमीकरणाच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे, असं पटोले म्हणाले. याच पार्श्वभूमीवर राज्यात महिलांचा राजकारणातील सहभाग आणखी सक्रीय व्हावा यासाठी प्रत्येक जिल्हा काँग्रेस कमिटीत एक महिला कार्याध्यक्ष नियुक्त करण्याचा निर्णय घेऊन महिला भगिणींना मकरसंक्रांतीची भेट देत असल्याची घोषणा पटोले यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- औरंगाबाद मनपात गुंठेवारीच्या ४ हजार फाईली जमा; ४५ कोटींचा महसूल गोळा!
- ‘बरं झालं यावेळी लॉकडाऊनची घोषणा केली नाही’; नवाब मलिकांचा मोदींना टोला
- मराठी पाट्यांची काय एलर्जी? माय मराठीला विरोध करून आणखी किती ‘जलील’ होणार?-रूपाली पाटील
- लग्नाच्या तीन वर्षानंतर प्रियंकाने केला बाळाच्या नियोजनाबद्दल खुलासा
- करुणा मुडेंनी रणशिंग फुंकले! पुण्यात येऊन चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकरांची घेतली शाळा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
