Share

‘बरं झालं यावेळी लॉकडाऊनची घोषणा केली नाही’; नवाब मलिकांचा मोदींना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला ३० राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला होता. या बैठकीनंतर राष्ट्रवादी नेते तसेच अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी यावर वक्तव्यं करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

राष्ट्रवादी नेते नवाब मलिक (Nawab Malik) यावेळी बोलताना म्हणाले, उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांच्या (U.P Elections) तोंडावर भाजपचे (BJP) अनेक नेते राजीनामा देऊन अन्य पक्षांत प्रवेश करत आहेत. त्याबाबतही नवाब मलिक यांनी भाष्य केले. पाच वर्षांचे अहंकारी सरकार हे एक कारण यामागे आहे, अशी टीका त्यांनी केली.

त्यानंतर लॉकडाऊन बाबत बोलताना नवाब मलिक म्हणाले, लॉकडाऊन लागू शकतो, अशी भीती लोकांमध्ये होती. मात्र, ही एक चांगली गोष्ट आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताना, स्थानिक पातळीवरील सद्यस्थितीवर राज्यांना यासंबंधी निर्णय घेण्यास सांगितले. मागील वेळी कोणताही विचार न करता आणि लोकांना विश्वासात न घेता लॉकडाऊनची घोषणा केली होती, असा टोला मलिक यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!