Share

अचानक ठरलेल्या लग्नाबद्दल सांगताना, मोहित रैनाला झाली पहिल्या भेटीची आठवण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ‘हे लग्न अगोदरपासून प्लान करून झालेलं नाही. अचानक आम्ही लग्नाचा निर्णय घेतला आणि लग्न झालं, असं सांगणारा प्रसिद्ध टीव्ही अभिनेता मोहित रैना (TV actor Mohit Raina) काही दिवसांपूर्वीच लग्नाच्या (wedding) बेडीत अडकला.

दरम्यान ‘देवों के देव…महादेव’ फेम अभिनेत्याने १ जानेवारी रोजी त्याच्या लग्नातील फोटो शेअर केले होते, यामुळे चाहते आश्चर्यचकित झाले होते. त्यानंतर त्याची पत्नी सोशल मीडियावर बरीच चर्चेत आली होती. अदिती कोण आहे? अभिनय क्षेत्राशी संबंधित आहे का? याबाबत अनेकांनी इंटरनेटवर सर्चही केलं. मात्र कोणालाच तिच्याबद्दल फारशी माहिती मिळाली नाही.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत (interview) मोहितनं अदिती आणि त्याच्या पहिल्या भेटीबद्दल आठवणी सांगितल्या तसेच लग्नाबाबत मोठा खुलासाही केला आहे. एका मुलाखतीत मोहित म्हणाला, ‘हे लग्न अगोदरपासून प्लान करून झालेलं नाही. अचानक आम्ही लग्नाचा निर्णय घेतला आणि लग्न झालं. त्यामुळे आमच्या लग्नात केवळ दोघांचे नातेवाईक उपस्थित होते.’ मोहित आणि अदितीचा विवाहसोहळा राजस्थानमध्ये पार पडला होता. टेलिव्हिजनवरील ‘देवों के देव…महादेव’ मालिकेद्वारे मोहित घराघरात लोकप्रिय झाल्याने त्याच्या अचानक लग्नाचे फोटो पाहून नेटकऱ्यांना मात्र अश्चर्याचा धक्का बसला होता.

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!