Share

“शिवसेनेला हे कळत नाही की त्यांना पूर्णपणे संपवण्याचा एक प्लॅन चाललाय”

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) आज(१४ जाने.)कोल्हापूर येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलत असतांना पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच यावेळी त्यांनी शिवसेनेला हे कळत नाही की त्यांना पूर्णपणे संपवण्याचा एक प्लॅन चाललाय, असेही म्हंटले आहे.

यावेळी बोलत असतांना पाटील म्हणाले की,’काल मुंबै बँकेची निवडणूक झाली, महाविकासआघाडीने चेअरमनशिप एकत्र लढवायची ठरवली. खरं म्हणजे, बँकांमध्ये पक्ष नसतात. मुंबै बँकेत देखील सगळ्यांनी मिळून बिनविरोध केली आणि मग दबावाने त्यामधील जे कलरवाले आहेत, यांनी वेगळा चेअरमन उभा केला. चला राष्ट्रवादीने चेअरनमन पदरात पाडून घेतला, शिवसेनेचा व्हाईस चेअरमन पडला? हे कसं झालं? शिवसेनेला हे कळत नाही की तुम्हाला पूर्णपणे संपवण्याचा एक प्लॅन चालला आहे आणि त्यामध्ये तुम्ही फसत चालला आहात’, असेही पाटील म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’आता तुम्ही गोवा, उत्तर प्रदेशमध्ये शरद पवारांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन चालले आहेत. त्यांना असे तोंड फोडून घेण्याची सवयच आहे, गेले डिपॉझिट जप्त झाले. त्यानिमित्ताने त्यांची वेगवेगळ्या राज्यात मत वाढतात, एक अखिल भारतीय पक्ष व्हायला एक किमान मतदारांची संख्या लागते, तुम्ही का सगळ्या ठिकाणी तुमचंही तोंड फोडून घेताय? हा प्रश्न आहे. तोंड फोडून घेणे म्हणजे पराभव, पडणे, डिपॉझिट जप्त होणे असे होय.’

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!