Share

“चित्रा वाघ फक्त पब्लिसिटी स्टंट करतात”; करुणा मुंडेंचे टीकास्त्र

Published On: 

पुणे : आज(१४ जाने.)पत्रकार परिषद घेत करुणा मुंडे(Karuna Munde) यांनी स्वतः चा नवीन पक्ष ‘शिवशक्ती सेना’ स्थापन केला असल्याचे म्हटले आहे. तसेच महिलांवरील होणाऱ्या अत्याचारावरून करुणा यांनी मुख्यमंत्री ठाकरे(Uddhav Thackeray) तसेच भाजप नेत्या चित्रा वाघ(Chitra Wagh) यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. याशिवाय चित्रा वाघ फक्त पब्लिसिटी स्टंट करतात, असा घणाघातही करुणा यांनी केला आहे.

यावेळी बोलत असतांना करुणा म्हणाल्या की,’आज संपूर्ण महाराष्ट्रात २४ तासांत किती बलात्कार होतात, याची आकडेवारी किती आहे. याबाबत एकदा बघावे. मात्र संसदेत, मंत्रीमंडळात अनेक महिला असून कुणीही यासाठी पुढे धडजावत नाही. जेव्हा मी जेलमध्ये होती तेव्हाही माझ्यासाठी कुणीही उभे राहिले नाही. एकमेव चित्रा ताई होत्या. परंतु, त्यांनीही फक्त मिडियासमोर पाठींबा दिला. मात्र मी त्याला पब्लिसिटी स्टंट समजते. जेव्हा प्रत्यक्षात त्या मंत्र्याविरोधात कारवाई केली जाईल, त्याला मी आवाज उठवणे समजते’, असेही करुणा मुंडे म्हणाल्या आहेत.

दरम्यान, पुढे त्या म्हणाल्या की,’मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा केला. परंतु, जेव्हा उद्धव ठाकरे संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याविरोधात निदान एफआयआर दाखल करतील तेव्हा मी राज्यात शक्ती कायदा आहे, असे मानेल. सर्वांनाच माहिती आहे संजय राठोड यांच्याविरोधातील पुरावा काय आहे. त्यामुळे राज्याचे प्रधान या नात्याने त्यांनी निदान संजय राठोड यांच्याविरोधात एफआयआर तरी दाखल करावा.’

महत्वाच्या बातम्या:

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!