🕒 1 min read
कोल्हापूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) आज(१४ जाने.)कोल्हापूर येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलत असतांना पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या प्रकृतीसंदर्भातही भाष्य केले.
यावेळी बोलत असतांना पाटील म्हणाले की,’उद्धव ठाकरे तर आमचे मित्र आहेत. पण शत्रू जरी असले तरी त्यांच्या तब्यतीबद्दल आपण त्याला शुभेच्छा देतो. त्यामुळे तो विषय नाही, विषय वारंवार असा चाललेला आहे की, जर अशी तब्यतीची स्थिती असेल तर त्यांनी कोणाला तरी चार्ज दिला पाहिजे. याच कारण म्हणजे महाराष्ट्रासारख्या १२ कोटी जनता असणाऱ्या राज्याचे असतात. कालची बैठक ही अत्यंत महत्वपूर्ण होती, तुम्ही टोपेंना पाठवलं, दिलीप वळसेंना पाठवले.’ तसेच देशाच्या सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री असताना, आपल्या राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना बोलायला वाव मिळणार नाहीच. पण तेच जर तुम्ही असता तर तुम्ही केवळ मुख्यमंत्री नाहीत, तर तुमचे खूप जवळचे संबंध देखील आहेत. त्यामुळे चारवेळा बैठकीत मोदी विचारत असतात, उद्धव ठाकरे तुमचं काय मत आहे. पण तुम्ही तब्येतीमुळे नाही जाऊ शकलात आणि तब्येतीची हेळसांड देखील करू नये, असेही पाटील म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’राज्याच्या हितासाठी अनेक प्रश्न निर्माण झालेले असून पंतप्रधान मोदींचे देखील हेच म्हणणं आहे की पोटावर पाय आणून निर्बंध लादू नये. तसेच महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी आज(१४ जाने.) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रत्यक्ष उपलब्ध नाहीत. घरी बसून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन करतो वैगरे हे पुरत नाही. मग सगळ्या मुख्यमंत्र्यांनी तसच केलं असतं. मुख्यमंत्री म्हणजे उठणे, जाणे, भेटणे, चर्चा करणे, लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे असं आहे. मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी खरंच दुसऱ्याकडे देण्याची ही वेळ आहे’, असेही यावेळी पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- “पाटी बदलण्याचा खर्च जास्ती आहे की दुकानाच्या काचा?”, मनसेचा इशारा
- राज ठाकरेंच्या सल्ल्यावर संजय राऊतांचे उत्तर; म्हणाले,‘कोणी काय सल्ला दिला यावर शिवसेना…’
- पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीतील मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर राऊतांचे भाष्य; म्हणाले,‘कधी काळी पंतप्रधानही…’
- “चंद्रकांत पाटलांनी उगाच इकडे तिकडे न तडमडता प्रतिमेला जपावं”, राऊतांचा हल्लाबोल
- “चित्रा वाघ फक्त पब्लिसिटी स्टंट करतात”; करुणा मुंडेंचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
