Share

राष्ट्रवादी पक्ष उत्तर प्रदेशात निवडणूक लढणार; शरद पवारांचे मोठे विधान

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशसह ५ राज्यांच्या निवडणुका होणार आहे. यापैकी तीन राज्यांत राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढणार असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले आहे. त्यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत याबाबत वक्तव्य केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आगामी ५ पैकी ३ राज्यांच्या निवडणुकीत सहभागी होईल. मणिपूरमध्ये राष्ट्रवादीचे ४ आमदार होते. त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून निवडणूक लढण्याबाबत चर्चा झाली असून मणिपूरमध्ये आम्ही एकूण ५ ठिकाणी निवडणूक लढू. असे शरद पवार म्हणाले आहेत.

तर गोव्यात काँग्रेस, टीएमसी, राष्ट्रवादीची चर्चा सुरू आहे. गोव्यात काही ठिकाणी आम्हाला निवडणूक लढवायची होती त्याची यादी आम्ही इतर दोन्ही पक्षांना दिली आहे. त्यामुळे पुढील २ दिवसात त्यावर अंतिम निर्णय होईल. असेही ते म्हणाले आहेत. दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष आणि इतर छोट्या पक्षांची युती झाली आहे. या सर्वांची एक मोठी बैठक होईल. तिथे काही जागा लढवण्यावर आमची चर्चा झाली आहे. उद्या लखनौमध्ये जागांची वाटप घोषित होईल. असेही शरद पवार म्हणाले आहेत.उत्तर प्रदेशातील जनता बदलाच्या शोधात आहे. राज्यात होणारा बदल आम्ही नक्कीच पाहणार आहोत. असे ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!