Share

गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ; पुणे पोलिसांनी केले टेम्पोभर कागदपत्र जप्त

Published On: 

🕒 1 min read

पुणे: जळगावच्या मराठा विद्याप्रासारक संस्थेशी निगडीत वादातून भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या विरोधात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता. या संदर्भात पुणे पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पुणे पोलिसांचे पथक या प्रकरणी तपासासाठी जळगावला गेले होते. आता तिथून टेम्पोभर कागदपत्रे पोलिसांनी पुण्यात आणली आहेत. त्यामुळे आता गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ होणार का, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.

पुण्याच्या कोथरूड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) जळगाव मराठा शिक्षण प्रसारक संस्थेसंदर्भातल्या वादातून महाजन आणि भोईटे यांच्या विरोधात अपहरणाचा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता. जळगाव मराठा शिक्षण प्रसारक संस्थेशी संबंधित कागदपत्र ही भोईटे आणि आणखी एक आरोपी तानाजी यांच्या घरी मिळून आली आहेत. जी कागदपत्रं संस्थेत असणं आवश्यक आहेत ती दुसरीकडं आढळल्यानं या कागदपत्रांतून मोठे लीड मिळण्याची शक्यता असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणी सुरुवातीला जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. नंतर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. अ‌ॅड. विजय पाटील (Adv. Vijay Patil) यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह इतरांविरुद्ध हा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता पोलिसांनी आणलेल्या कागदपत्रातून काय माहिती मिळते आणि त्यामुळे गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ होणार का, अशी चर्चा जोर धरत आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!