Share

पुण्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ; महापौर म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

पुणे: राज्यभरात आता पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे राज्यभरात आता निर्बंध देखील लागू करण्यात आले आहेत. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन सध्याच्या या रुग्णवाढीस कारणीभूत ठरत असून राज्यात सध्या चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे. मुंबईमध्ये (Mumbai) रुग्णांची संख्या २० हजारांच्या पुढे गेली असून पुण्यातही कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.

पुणे मनपा (Pune) हद्दीत आज ४ हजार ०२९ नवे कोरोनाबाधितांची (Corona Patients) नोंद झाली आहे. सध्या पुण्यात असणाऱ्या १४ हजार ८९० सक्रीय रुग्णांपैकी केवळ ५.४८ टक्केच रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. शिवाय आज केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. काल पुण्यामध्ये एका दिवशी २,४७१ रुग्ण सापडले होते. दैनंदिन रुग्णसंख्येत आज वाढ झालेली पहायला मिळाली आहे.

पुण्यात वाढणाऱ्या या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी वक्तव्य केलं आहे. महापौर यांनी ट्विट करत म्हणाले की, पुण्यातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून काळजी करण्याऐवजी काळजी घ्यावी, इतकंच. असं ट्विट त्यांनी केलं आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुण्यात कडक निर्बंध लागू केले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!