🕒 1 min read
मुंबई : बिग बॉस १५ (Bigg Boss 15) मध्ये सध्या करण कुंद्रा (Karan Kundra) आणि तेजस्वी प्रकाश (Tejaswi Prakash) यांच्या नात्यात दुरावा आल्याचं पाहायला मिळत आहे. प्रत्येक दिवशी काही ना काही कारणाने या दोघांमध्ये वाद होताना दिसतात. यामुळे त्यांचे चाहतेही त्यांच्याबद्दल चिंता करत आहेत आणि या दोघांमध्ये पुन्हा सर्व काही ठीक व्हावं अशी इच्छा व्यक्त करताना दिसत आहेत. मात्र तेजस्वी आणि करण यांचे चाहते त्यांना एकत्र पाहू इच्छित असले तरीही करण कुंद्राच्या बहिणीला मात्र या दोघांचं नातं मान्य नाही. तेजस्वीवर नाराज असल्याचं तिनं ( मीनू कुंद्रा ) नुकत्याच केलेल्या एका ट्वीटवरून (Tweet)दिसत असून जोरदार चर्चा सुरू आहे.
दरम्यान एका चाहत्यानं करण कुंद्राची बहीण मीनू कुंद्राला (sister Meenu Kundra) एका ट्वीटमध्ये टॅग केलं होतं. या ट्वीटमध्ये या चाहत्यानं मीनूला करण आणि तेजस्वीचं नातं मान्य करण्याची विनंती केली होती. दोघांची जोडी बेस्ट असल्याचंही त्यानं आपल्या ट्वीमध्ये म्हटलं होतं. पण यावर मीनूनं जे उत्तर दिलं त्यावरून तर ती तेजस्वीवर खूपच नाराज असल्याचं दिसून येत आहे.
https://twitter.com/KKTP03/status/1478883592197443588?s=20
Please teja ko be accept kardi
karan k leye ache hain
best jore hain❤❤— zahoor shad (@zahoorshad8) January 5, 2022
मीनूनं करण- तेजस्वीच्या चाहत्याच्या या ट्वीटला रिप्लाय करताना लिहिलं, ‘मी काही तिला खूप आधीपासून ओळखत नाही. जे ती मला आवडेल किंवा नाही. पण ती माझ्या भावासोबत जसं वागते ते मला अजिबात आवडत नाही. मला ते सहन होत नाही. ती करणला दुःखी करते ते मला आवडत नाही. माझ्यासाठी फक्त माझा भाऊ करण महत्त्वाचा आहे.’
अलिकडेच करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्यात बिग बॉसच्या घरात मोठं भांडण झालेलं पाहायला मिळालं. यावेळी करणनं तेजस्वीला ‘तुझा चेहरा पाहा, तुझं सत्य मला समजलं आहे.’ असं म्हटलं होतं. तर तेजस्वीनंही करणला ‘भित्रा आहेस’ असं म्हटलं होतं. केवळ करणच नाही तर घरातील इतर सदस्यांनाही तेजस्वीचं वागणं अनेकदा पटत नसल्याचं ही बोललं जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Sanjay Raut : “…अपेक्षा न ठेवता आपला स्वतंत्र संसार मांडा”, संजय राऊतांचा बंडखोर आमदारांना सल्ला
- Aditya Thackeray : “युवासैनिकांनो, आताच्या राजकीय परिस्थितीकडे लक्ष न देता…”, आदित्य ठाकरेंचे आवाहन
- Draupadi Murmu : “अवघ्या 15 मिनिटांपूर्वी मोदींनी फोन करून…”, द्रौपदी मुर्मू यांनी सांगितला ‘तो’ किस्सा
- Devendra Fadnavis : “ज्यांनी बांठिया आयोग नेमला, तेच आता…”, देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका
- Sanjay Raut : “आमदार-खासदार फोडून सरकारे बनविली…”, संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
