Share

‘त्या’ चर्चेवर पटोलेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, …त्यात गैर काय?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यातील कॉंग्रेसचे आमदार आपल्याच काही मंत्र्यांवर नाराज असल्याची चर्चा सध्या राज्यात रंगत आहे. इतकेच नाही तर हे आमदार राज्यातील काँग्रेसच्या मंत्र्यांविरोधात तक्रार करण्यासाठी थेट दिल्लीला हायकमांडची भेट घेणार असल्याचेही समोर आले आहे. आता असे असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे.

‘आमदारांनी, कार्यकर्त्यांनी हायकमांडला भेटणं हे चुकीचं नाहीये. मंत्र्यावर ते नाराज आहेत, असं माझ्यापर्यंत तर काही आलेलं नाही. राज्यात काँग्रेस एकजुटीने काम करत आहे. लोकांना काँग्रेसकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. असे पटोले यांनी म्हटले आहे.

दरम्यान नाना पटोले यांनी जरी ही चर्चा फेटाळली असली तरी, हे आमदार दिल्लीला आपली नाराजी कळवणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच पटोले यांच्याकडून या नाराज आमदारांची नाराजी दूर होत नसल्यानेही आमदार दिल्लीला जाणार असल्याची चर्चा आता रंगत आहे. त्यामुळे आता हे नाराज आमदार खरच दिल्लीला जाणार का, हे बघणे उत्सुकाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!